घरमनोरंजननवऱ्याने फ्लॅटबाबत दिलेल्या वचनाचा राखीकडून मोठा खुलासा

नवऱ्याने फ्लॅटबाबत दिलेल्या वचनाचा राखीकडून मोठा खुलासा

Subscribe

मी सांगु इच्छिते की रितेशने माझ्या आईवर आणि माझ्यासाठी खूप खर्च केला आणि त्याने मला मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे वचन दिले आहे, असे राखी म्हणाली.

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ही नेहमी तिच्या व्हिडिओ आणि विचित्र वक्तव्यांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत येत असते. राखी नेहमीच तिचा पती रितेश याबाबत वकत्तव्य करत असते. मात्र अद्याप तिने त्याला कधीही कॅमेरासमोर आणले नाही. ती नेहमीच तिचे लग्न झाले आहे असे सगळ्यांना सांगत असते मात्र तिच्या नवऱ्याला अजून कोणीही पाहिले नाही आहे. नेहमीच ती तिचा पती रितेश याविषयी काहीना काही खुलासे करत असते. यावेळीही तिने एका मुलाखतीदरम्यान यावर एक वकतव्य केले होते. “मी माझ्या आयुष्यात बरेच निर्णय विचार न करता पटकन घेतले आहेत. जर हे लग्न टिकलं नाही. तर मी पुन्हा लग्न करणार नाही आणि मी सांगु इच्छिते की रितेशने माझ्या आईवर आणि माझ्यासाठी खूप खर्च केला आणि त्याने मला मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे वचन दिले आहे, असे राखी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

 पुढे राखी म्हणाली, “परंतु रितेशने मला सांगितले की त्याला माझ्यासोबत राहायचे आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगामुळे तो इथे येऊ शकला नाही. मी वाट बघतं आहे. मी येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवते आणि मी खोटं लग्न केलेलं नाही. त्याला मी खोटी वचन दिलेली नाही. मी त्याला इतर कोणत्याही स्त्रीसोबत वाटू शकतं नाही. माझ्याशी लग्न करण्यााधी त्याचे लग्न झालेले आहे. तो एक वडील देखील आहे. मी त्याच्यावर निर्णय सोडला आहे.”

- Advertisement -

हे वाचा- Corona Vaccination: बॉलिवूडच्या भाईजानने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -