घरमनोरंजनबिग बॉस १२ च्या घरात ही मंडळी

बिग बॉस १२ च्या घरात ही मंडळी

Subscribe

बिग बॉसमधून यंदाच्या १२ व्या सिझनसाठी नव्या घरात विविध क्षेत्रातील माणसं एकत्र येणार आहेत. येत्या १०० दिवस हे एका घरात राहाणार आहेत.

बिग बॉसमधून यंदाच्या १२ व्या सिझनसाठी नव्या घरात विविध क्षेत्रातील माणसं एकत्र येणार आहेत. येत्या १०० दिवस हे एका घरात राहाणार आहेत. लोणावळ्याच्या बिग बॉसच्या घरात याचं प्रिमियर शूटींग नुकतंच करण्यात आलं.यंदा प्रेमी युगूलं, पोलीस आणि वकिल अशी मंडळीही बिग बॉसच्या घरात असणार आहेत. तर नेहमीप्रमाणे सलमान सूत्रसंचालक आहे. बिग बॉसच्या घराचं डिझाईन ओमंग कुमारनं केलं आहे. यंदा ससुराल सिमर का मालिकेतील आणि नुकत्याच आलेल्या पलटन चित्रपटातही दिपिका कक्कड ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात आहे.

शिवाय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे, करणवीर बोहरा, अभिनेत्री सृष्टी रोडे, शिवाय भजन आणि गझल गायक अनुप जलोटा हे सुद्धा या घरात आहेत. पण इतर ग्लॅमरस जोड्यांमध्ये अनुपजींचं काम काय? असा प्रश्न विचारला जात आहे. वादग्रस्त क्रिकेटपटू श्रीसंत, सिंगर जसलीन मठरू, सुरभी राणा, किर्ती जीएसटी, रोशनी बनिक, मितल जोशी, भोजपुरी सिंगर दिपक ठाकूर, उर्वशी वाणी, शिवाषिश मिश्रा, सौरभ पटेल, सभा खान, सोमी खान, रोमील चौधरी, निर्मल सिंह शिवाय सुरुवातीच्या एपिसोडमध्ये गतविजेती शिल्पा शिंदेही येणार आहे. बिग बॉसच्या घरात नवे खेळाडू काय धुमाकूळ घालणार हे लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -