हे आहेत बिग बॉस १३ चे स्पर्धक

बिग बॉस १३ च्या घरातील प्रशस्त लिव्हींग रूम

हिंदी बिग बॉसचे १३ वे सीजन आज, रविवारपासून सुरू होत आहेत. यामध्ये कोणकोणत्या स्पर्धकांची वर्णी लागणार, त्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री ९ वाजता या सीजनमधील सदस्यांच्या धमाकेदार एन्ट्री पोहायला मिळणार असून यंदाच्या शोचेही सूत्रसंचालक बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान करणार आहे. यंदा कोणते सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरामध्ये जाणार याची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे आहेत बिग बॉसचे रहिवासी

अभिनेत्री आरती सिंह, म्युझिक डायरेक्टर अनु मलिक यांचे भाऊ अबू मलिक, अभिनेत्री देवोलिना भट्टचार्य, अभिनेत्री दिलजीत कौर, अभिनेता पारस छाबडा, अभिनेत्री रश्मी देसाई, न्यूज अँकर शेफली बग्गा, मॉडेल असीम रियाज, अभिनेत्री कोएना मित्रा, अभिनेत्री माहिरा शर्मा, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, अभिनेत्री शहनाझ कौर गिल, इत्यादींचा समावेश आहे. ही नाव जरी समोर येत असली तरी, याबाबत कलर्स वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

सौजन्य – न्यूज एसडी

बिग बॉस हिंदीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसचे घर गोरेगाव फिल्म सिटीत उभारण्यात आले आहे. यापूर्वी सर्व सीजनचे शूट लोणावळ्यात झाले होते. यंदा घरात अनेक बदल झालेलेही पाहायला मिळणार आहेत. ओमनग कुमार यांनी प्लास्टिक न वापरता बिग बॉसच्या घराला कलरफूल लूक दिला आहे.