घरताज्या घडामोडीराधे माँने ऑफर स्विकारली, आता Bigg Boss 14 गाजवणार!

राधे माँने ऑफर स्विकारली, आता Bigg Boss 14 गाजवणार!

Subscribe

प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय Reality शो म्हणजे सलमना खान होस्ट करत असलेला बिग बॉस. बिग बॉसचे आत्तापर्यंतचे १३ सिझन प्रचंड गाजले. काही वादग्रस्तही ठरले. कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बिग बॉस चे १४ वे सीझन लांबणीवर पडले. पण आता सलमना खानचा १४ व्या सीझनचा प्रोमो प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रोमो आल्यानंतर यंदा बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राधे माँ सहभागी होणार असल्याचं समजत आहे. मात्र अद्याप चॅनलने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

टेलीचक्करने दिलेल्या माहितीनुसार स्वत:ला देवी मानणाऱ्या सुखविंदर कौर उर्फ राधे माँ बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार आहेत. गेल्या अनेक सीजनमध्ये बिग बॉसकडून त्यांना कार्यक्रमात येण्यासाठी विचारणा केली जात होती. मात्र यंदाच्या वर्षी त्या बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. राधे माँ यांचा जन्म गुरूदारपूर जिल्ह्यात झाला. लहान वयातच त्यांनी भक्तीचा मार्ग निवडला. आपला पोशाख आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे त्या अनेकदा वादात सापडल्या आहेत.

- Advertisement -

बिग बॉस न बघण्याची भूमिका

सुशांतच्या मृत्यूमागे नेपोटिजम आणि बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे सुशांतचे चाहते सलमान खानलाही खूप ट्रोल करीत आहेत. अनेकांनी त्याच्या कार्यक्रम पाहणार नसल्याची भूमिका घेतली आहे.


हे ही वाचा – माकडांमुळे माणसावरील कोरोनाची लस येण्यास उशीर; वाचा सविस्तर रिपोर्ट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -