सध्या कलर्सवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस सीझन १४’मध्ये फायनल वीक सुरू आहे. बिग बॉसच्या घरात आता एजाज खान, अभिनव शुक्ला, रुबीना दिलाइक, जास्मिन भसीन, राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील दोन सदस्य एजाज खान आणि अभिनव शुक्ला फायनलिस्ट झाले आहेत. ‘बिग बॉस सीझन १४’चा होस्ट अभिनेता सलमान खानने मागच्या आठवड्यात ‘बिग बॉस १४’च्या फायनलमध्ये चार सदस्य असतील असे जाहीर केले होते.
त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात फायनलिस्ट बनण्यासाठी चुरसीची स्पर्धा रंगली आहे. यामधील चार सदस्य या आठवड्यात घराबाहेर होणार आहेत. यापूर्वी अली गोनी आणि कविता कौशिक हे दोन सदस्य घराबाहेर गेले आहेत. आता बिगच्या बॉसच्या घराबाहेर कोण जाणार आहे? याची माहिती ‘द खबरी’ या ट्विटर हँडलने दिली आहे. ‘द खबरी’च्या माहितीनुसार, आता बिग बॉसच्या घराबाहेर दोन मराठमोळे सदस्य जाणार आहेत, ते म्हणजे निक्की तांबोळी आणि राहुल वैद्य. ‘द खबरी’ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘निक्की तांबोळी घराबाहेर गेली आहे.’ त्यानंतर काही तासांनंतर अजून एक ट्विट करून लिहिले आहे की, ‘निक्की तांबोळीनंतर राहुल वैद्य देखील बिग बॉसच्या घरातून बाहेर झाला आहे.’
EXCLUSIVE AND CONFIRMED#NikkiTamboli has been eliminated from the House
Retweet if Happy
— The Khabri (@TheRealKhabri) December 4, 2020
EXCLUSIVE And Confirmed
After #NikkiTamboli now#RahulVaidya has been Eliminated from the House
Retweet if Shocked
— The Khabri (@TheRealKhabri) December 5, 2020
जर या ट्विटची माहिती खरी झाली तर राहुल वैद्य बाहेर झाल्यामुळे सर्वजण हैराण होण्याची शक्यता आहे. सध्या ट्विटवर #RahulVaidya असे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. महिलासाठी अपशब्द वापरणे, महिलाचा अपमान करणे असे आरोप काल (शुक्रवार) बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांनी राहुल वैद्यवर केले. त्यामुळे #RahulVaidya हे हॅशटॅग वापरून राहुल वैद्यला लोकं सपोर्ट करताना दिसत आहेत. पण जर निक्की तांबोळी आणि राहुल वैद्य घराबाहेर गेले तर जास्मिन भसीन आणि रुबीना दिलाइन या दोघी बिग बॉसच्या फायनलिस्ट होती. त्यानंतर बिग बॉसचे चार फायनलिस्ट एजाज खान, अभिनव शुक्ला जास्मिन भसीन आणि रुबीना दिलाइक होतील.
हेही वाचा – शिल्पाने रेस्टॉरंट ओपनिंगपूर्वी ‘या’ मराठी जोडप्याला दिलं आमंत्रण