Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कपड्यावरच्या प्राईज टॅगमुळे ट्रोल होतेय जास्मिन, व्हिडिओ व्हायरल

कपड्यावरच्या प्राईज टॅगमुळे ट्रोल होतेय जास्मिन, व्हिडिओ व्हायरल

या आधीही जास्मिन तिच्या कपड्यांवरुन ट्रोल झाली आहे. मात्र आता जास्मिनच्या ट्रोल होण्याचे कारण पाहून सर्वांनाच हसू येत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जास्मिन भसीन तिच्या हॉट आणि सेक्सी लुकमुळे सतत चर्चेत असते. तिच्या फॅशन स्टाईलमुळेही ती बऱ्याचदा चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ती ट्रोलही होत असते. सध्या जास्मिन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ती ट्रोल होतेय ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या कपड्यांना लटकत असलेल्या प्राईज टॅगमुळे. या आधीही जास्मिन तिच्या कपड्यांवरुन ट्रोल झाली आहे. मात्र आता जास्मिनच्या ट्रोल होण्याचे कारण पाहून सर्वांनाच हसू येत आहे. बिग बॉस१४चा स्पर्धक अली गोनी याला शुभेच्छा देण्यासाठी जास्मिन बिग बॉसच्या कार्यक्रमात गेली होती. त्यावेळी तिने तिच्या ड्रेसच्या मागे लटकत असलेल्या प्राईज टॅगमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

बिग बॉस १४ च्या एका कार्यक्रमाला जास्मिनने हजेरी लावली होती. त्यावेळी जास्मिन माध्यमांशी बोलत होती. बिग बॉसमध्ये कोण जिंकेल याविषयी जास्मिन बोलताना ‘सगळेच उत्तम खेळत आहेत. सगळ्यांची खूप मेहनत घेतली आहे. अलीने हा बिग बॉस १४ जिंकावे असे मला वाटत’, असे म्हणत जास्मिन निघून जाताना तिच्या ड्रेसच्या मागे असलेला प्राईज टॅग लटकताना दिसला. माध्यमात जास्मिनचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र जास्मिनला तिच्या ड्रेसमागे लटकत असलेल्या टॅगची जराही जाणीव नव्हती हे ही त्या व्हिडिओमधून दिसत आहे.

जास्मिनने यावेळी जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर जांभळ्या रंगाचे शूजही घातले होते. बिग बॉसच्या फिनालेमध्ये जास्मिन एक डान्स परफॉर्मन्स देणार आहे, ते सरप्राइज असेल अस म्हणत ती तिथून निघून जाते आणि तिच्या कपड्यांच्या मागे असलेला प्राइज टॅग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – राखी सावंतच्या बाळाला पाहिलत का? पाहा व्हिडिओ

 

 

- Advertisement -