शमिता शेट्टी आणि राकेश बापटचा ब्रेकअप; महिनाभरदेखील टिकलं नाही नातं

दोघांचे रिलेशन महिनाभर देखील टिकू शकले नाही यावरुन सगळेच नाराजी व्यक्त करत असून दोघांच्या ब्रेक अपनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

bigg Boss 15 Fame shamita shetty and raqesh bapat break up
शमिता शेट्टी आणि राकेश बापटचा ब्रेकअप; महिनाभरदेखील टिकलं नाही नातं

बिग बॉस १५ ज्यांनी गाजवला ते म्हणजे शमिता शेट्टी आणि राकेश बापट. बिग बॉसच्या घरात राकेश शमिताच्या नात्याला सुरुवात झाली होती. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही प्रचंड प्रेम दिले होते. मात्र हे लव्ह बर्ड आता लव्ह बर्ड राहिले नसून दोघांचा ब्रेकअ झाल्याचे समोर आले आहे. दोघांचे रिलेशन महिनाभर देखील टिकू शकले नाही यावरुन सगळेच नाराजी व्यक्त करत असून दोघांच्या ब्रेक अपनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, राकेश आणि शमिता शेट्टी यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये काही गोष्टींवर मतभेद झाले. त्यांच्यातील भांडणाने टोक गाठत दोघांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर देखील दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहे. परंतु राकेश किंवा शमिता यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

मराठमोळा राकेश बापट शमिता सोबत रिलेशनमध्ये आल्यानंतर तिच्या कुटुंबासोबत फार जवळचे संबंध निर्माण केले होते. शमिताच्या बर्थ डे पार्टीला देखील राकेश दिसला होता. इतकेच नाही शिल्पा शेट्टीने देखील तिची मुलगी समीशाच्या बर्थ डेला अलिबागमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला राकेश बापटला आमंत्रण दिले होते. शमिता शेट्टीची आई सुनंदा शेट्टीला देखील राकेश बापट जावई म्हणून आवडू लागला होता. राकेश सुनंदा शेट्टीसोबत देखील फार मनमोकळ्या गप्पा मारत असे.

बिग बॉस १५ मध्ये शमिता आणि राकेश यांच्यातील प्रेमाला सुरुवात झाली होती. दोघे काही दिवसांपूर्वी सिक्रेट वेकेशनला गेले होते. शमिता शेट्टी सध्या ४२ वर्षांची असून अजूनही तिचे लग्न झालेले नाही. तर राकेश बापट हा देखील ४२ वर्षांचा असून तो घटस्फोटीत आहे २०१९मध्ये राकेशने पत्नी रिध्दी डोगरा सोबत घटस्फोट घेतला आहे. राकेश बापट सोबत रिलेशनमध्ये आल्यानंतर शमिता यावर्षी लग्न करेल असे सर्वांना वाटले होते मात्र त्याआधीच दोघआंचा ब्रेक अप झालाय.


हेही वाचा – CID फेम दयाचं मराठीत पदार्पण, ‘गरम किटली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला