Bigg Boss 15: टास्क दरम्यान तेजस्वी प्रकाशचे करण कुंद्रासोबत कडाक्याचे भांडण, नंतर रडू लागली ढसाढसा

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasvi Prakash)  आणि करण कुंद्रा (karan Kundra)  यांची. दोघांची घरातील केमिस्ट्री सर्वांनीच पाहिली आहे. मात्र दोघांच्या नात्यात आता चांगलाच खटका उडाला आहे. टास्क दरम्यान करण आणि तेजस्वी यांच्या कडाक्याचे भांडण झाले.

Bigg Boss 15 karan kundra and tejasvi prakash fight during task
Bigg Boss 15: टास्क दरम्यान करण कुंद्रासोबत कडाक्याचे भांडण, नंतर ढसाढसा रडली तेजस्वी प्रकाश

बिग बॉस १५च्या (Bigg Boss 15)  घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळत आहे. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना टास्क दिला आहे जो पूर्ण करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. बिग बॉसच्या घरातील सध्या एक कपल चांगलेच चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasvi Prakash)  आणि करण कुंद्रा (karan Kundra)  यांची. दोघांची घरातील केमिस्ट्री सर्वांनीच पाहिली आहे. मात्र दोघांच्या नात्यात आता चांगलाच खटका उडाला आहे. टास्क दरम्यान करण आणि तेजस्वी यांच्या कडाक्याचे भांडण झाले. दोघांनी एकमेकांसोबत भांडण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र भांडणानंतर याचा तेजस्वीला भयंकर त्रास झाला आहे. तेजस्वीला पाहून घरातील सर्व स्पर्धकांना तिची दया आली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस १५ च्या मागच्या एपिसोड दरम्यान बिग बॉसने घरातील स्पर्धकांना टास्क दिला होता. टास्क खेळताना करण कुंद्रा आणि उमर यांनी पहिलेच शमिता शेट्टीला विनर केले आहे असे तेजस्वीला कळले. तेजस्वी आणि शमिताचा दोस्ताना तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र हे सगळ पाहून तेजस्वी चांगलीच चिडली आणि तिने करणला टोमणे मारालया सुरुवात केली. निशांत भट्ट आणि देवोलीना भट्टाचार्य यांना चितवायला सुरुवात केली. दुसरीकडे देवोलीना आणि राखी करणकडे जाऊन नेमके काय झाले आहे हे क्लियर कर असे म्हणाली. मात्र तरीही तेजस्वी कमेंट पास करत राहिली.

एपिसोडचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे ज्यात तेजस्वी करणला म्हणते माझा एक शब्द तुला इतका लागला? त्यावर करण उत्तर देत म्हणतो, आधी स्वत:कडे बघ नंतर इतरांना न्याय दे. इतकं बोलून तो तिथून निघून जातो. मात्र तेजस्वी त्यांचे बोलणे संपव असे सांगते . मात्र अस्वस्थ स्थितीत असलेला करण अरे ये तुझा चेहरा बघ असे तेजस्वीला म्हणतो. या वाक्याने तेजस्वीला फार वाईट वाटते. भांडण झाल्यानंतर तेजस्वी तिच्या बेडवर जाऊन झाल्या प्रकारावर प्रतीक आणि निशांत समोर ढसाढसा रडते.


हेही वाचा – Bigg Boss 15: राखीसोबत केलं असं काही म्हणून शमितावर चिडला सलमान खान