घरताज्या घडामोडीBigg Boss 15: राखीसोबत केलं असं काही म्हणून शमितावर चिडला सलमान खान

Bigg Boss 15: राखीसोबत केलं असं काही म्हणून शमितावर चिडला सलमान खान

Subscribe

विकेंड वॉर फार मजेशीर असणार

बिग बॉस १५ सध्या चर्चेत आहे. राखी सावंतच्या एंट्री नंतर बिग बॉसच्या घरात सतत काहीना काही घडत आहे. आठवडाभर घरात झालेल्या भांडणानंतर विकेंडला सलमान खान सगळ्यांची शाळा घेतो. बिग बॉसच्या घरात कोणत्याही चुकीला माफी नसते. त्यामुळे विकेंडला स्पर्धकांच्या प्रत्येक चुकीचा पाढा वाचला जातो. या विकेंडला सलमान खान घरातील सदस्यांसोबत फेअर अनफेअर गेम खेळणार आहे. सलमानने ‘सगळ्यात अनफेअर स्पर्धक कोण आहे?’ असा प्रश्न विचारला. यावर शमिता शेट्टी सतत देओलीना भट्टाचार्यची बाजू घेण्यासाठी राखी सावंतचे नाव घेते. त्यावर सलमान खान शमिता शेट्टीवर चिडतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by @mr_khabari

- Advertisement -

या आठवड्यात एका टास्कमध्ये खेळताना शमिता शेट्टीने राखी सावंतला जोरदार धक्का दिला. राखीला धक्का दिल्याने सलमानने शमिताची जोरदार शाळा घेतली. राखीला असा धक्का देणे योग्य नाही. तुझा ओव्हर स्मॉर्टनेस कमी कर, असे म्हणत सलमान शमितावर चिडला. टास्क दरम्यान शमिता आणि राखी एकमेकींसमोर आल्या. शमिताने राखीला दूर व्हायला सांगितले मात्र राखी ऐकायला तयार नव्हती. म्हणून शमिताने राखीला जोरदार धक्का दिला. शमिता यावेळी फार अग्रेसिव्ह झाली म्हणून सलमान विकेंड वॉरला शमितावर चिडला.

यावेळीचा विकेंड वॉर फार मजेशीर असणार आहे. सलमान खानसोबत यावेळी शमिता सोबतच करण कुंद्राचीही शाळा घेणार आहे. तर दुसरीकडे RRR सिनेमाचे कलाकारही बिग बॉसच्या घरात प्रमोशनसाठी येणार आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक देखील RRRच्या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 83 Box Office Collection Day1: पहिल्याच दिवशी ८३ची बॉक्स ऑफिसवर १५ कोटींची कमाई

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -