Bigg Boss 15: Tejasswi Prakashच्या कमेंटमुळे ढसाढसा रडला Pratik Sehajpal

प्रतीकची हालत पाहून केवळ घरातील स्पर्धकच नाही तर प्रतीकचे फॅन्स देखील त्याच्या पाठिशी होते. सोशल मीडियावर तेजस्वीला ट्रोल करण्यात आले. तेजस्वी ही विक्टिम आणि सिम्पेथी कार्ड खेळत असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे तेजस्वीवर तिचे फॅन्स सध्या नाराज आहेत.

Bigg Boss 15 ticket to finale Pratik Sehajpal cried because of Tejasswi Prakash comment
Bigg Boss 15: Tejasswi Prakashच्या कमेंटमुळे ढसाढसा रडला Pratik Sehajpal

बिग बॉस15 ची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash)  सर्वांच्या निशाण्यावर आहे. मागील एपिसोडमध्ये तेजस्वी टिकीट टू फिनाले हरली होती. याचवेळी तेजस्वी आणि प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal)  यांच्यात कडाक्याचे भांडण देखील झाले होते. टास्क दरम्यान दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले आणि यात ज्यात तेजस्वीनीने प्रतीक फार गंभीर आरोप केले. ज्याने प्रतीक प्रचंड डिस्टर्ब झाला होता. टास्कनंतर प्रतीक तेजस्वीच्या आरोपांमुळे ढसाढसा रडताना दिसला. प्रतीक शमिता शेट्टीच्या पुढ्यात बसून झाल्याप्रकारवर खूप रडला. रडणाऱ्या प्रतीकला शमिता शांत करताना दिसली. (Pratik Sehajpal cried because of Tejasswi Prakash comment)

प्रतीकला शांत करताना शमिता शेट्टीने त्याला मिठी मारली. तर दुसरीकडे राखी सावंतही प्रतीकची समजूत काढत होती. प्रतीक घरात सर्वांशी आदराने वागणारा मुलगा आहे. घरातील सर्वांची तो काळजी घेतो असे राखीने म्हटले. मात्र तेजस्वीने केलेली कमेंट सतत प्रतीकच्या डोक्यात फिरत होती आणि तो रडत होता. प्रतीकची हालत पाहून केवळ घरातील स्पर्धकच नाही तर प्रतीकचे फॅन्स देखील त्याच्या पाठिशी होते. सोशल मीडियावर तेजस्वीला ट्रोल करण्यात आले. तेजस्वी ही विक्टिम आणि सिम्पेथी कार्ड खेळत असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे तेजस्वीवर तिचे फॅन्स सध्या नाराज आहेत.

टास्कवेळी प्रतीक सहजपालच्या नाकाला दुखापत झाली. तेव्हा तेजस्विनीने तू माझ्यावर मुद्दाम टीका करत होतास म्हणून ही तुझ्या कर्माची फळे आहेत, असा टोमणा मारला. तेजस्वीनीची हीच गोष्ट प्रतीकच्या जिव्हारी लागली आणि तो घरात ढसाढसा रडला.

याआधी देखील तेजस्वीसोबत अनेक स्पर्धकांची भांडणे झाली होती. शमिता शेट्टी, राखी सावंत यांच्यासोबत तेजस्वीचे टास्क दरम्यान बऱ्याचदा वाद झाले आहेत.  टास्क दरम्यान करण आणि तेजस्वी यांच्या कडाक्याचे भांडण झाले. दोघांनी एकमेकांसोबत भांडण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र भांडणानंतर याचा तेजस्वीला भयंकर त्रास झाला आहे. तेजस्वीला पाहून घरातील सर्व स्पर्धकांना तिची दया आली.


हेही वाचा – Bigg Boss 15: टास्क दरम्यान तेजस्वी प्रकाशचे करण कुंद्रासोबत कडाक्याचे भांडण, नंतर रडू लागली ढसाढसा