Bigg Boss 15: Rakhi Sawant ने आधीच केली होती Tejasswi Prakashच्या विजेतेपदाची भविष्यवाणी

मी मागच्या सीझनमध्ये देखील खुलेआम म्हटले होते की रुबीना दिलेक जिंकेल आणि तीच ट्रॉफी जिंकली. यावेळी तेजस्वी प्रकाशच जिंकणार. राखी पुढे म्हणाली, मी अनेक वर्षांपासून या शोमध्ये खेळत आहे त्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टी फार बारकाईने माहिती आहेत.

Bigg Boss 15 was fixed Rakhi Sawant had already predicted Tejasswi Prakash victory
Bigg Boss 15: Rakhi Sawant ने आधीच केली होती Tejasswi Prakashच्या विजेतेपदाची भविष्यवाणी

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या बिग बॉस 15 चा (Bigg Boss 15)  विजेता अखेर रविवारी घोषित करण्यात आला. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)  ही बिग बॉस 15 ची विजेती ठरली. तेजस्वीच्या विजयानंतर सर्वत्र एकच धुमाकूळ उडाला असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील #tattichannelcolorstv आणि #boycottbigboss असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. बिग बॉसमध्ये फिक्स्डिंग झाल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे. अभिनेत्री राखी सावंतने देखील घराबाहेर पडल्यानंतर आणि बिग बॉसच्या घरात असताना तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती होणार अशी भविष्यवाणी आधीपासूनच केली होती. राखीच्या या खुलास्यावर तेव्हा अनेकांनी अविश्वास दाखवला होता मात्र रविवारी विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित झाल्यानंतर राखीची भविष्यवाणी खरी ठरली.

राखी सावंतला माहिती होते बिग बॉस 15च्या विजेत्याचे नाव?

राखी सावंतची बिग बॉस15 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झाली होती. टिकट टू फिलानेच्या टास्कमध्ये राखी करण कुंद्रा आणि उमर रियाज यांच्याशी बोलताना तेजस्वी प्रकाश फिलानेमध्ये पोहोचणार आहे आणि तीच जिंकणार असे ती म्हणाली होती. राखीने यावेळी फुल कॉन्फिडन्सने बिग बॉसमध्ये कोण जिंकणार हे सांगितले होते.

राखीने करण कुंद्रा आणि उमर रियाजला म्हटले होती की, मी मागच्या सीझनमध्ये देखील खुलेआम म्हटले होते की रुबीना दिलेक जिंकेल आणि तीच ट्रॉफी जिंकली. यावेळी तेजस्वी प्रकाशच जिंकणार. राखी पुढे म्हणाली, मी अनेक वर्षांपासून या शोमध्ये खेळत आहे त्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टी फार बारकाईने माहिती आहेत.

तेजस्वी प्रकाशच्या विजेतेपदावर केलेल्या खुलास्यानंतर सलमान खानने राखीला विकेंडच्या वॉरला चांगलेच झापले होते. बिग बॉसचा विजेचा कोण होणार हे मेकर्सना देखील माहिती नसते या पर्वात तेजस्वी प्रकाश जिंकणार हे तु इतक्या विश्वासाने कसे म्हणू शकते,असे सलमानने म्हटले होते.


हेही वाचा –  Tejasswi Prakash च्या ‘बिग बॉस15’ च्या विजेतेपदावरून नवा वाद; ट्विटरवर वॉर सुरु