Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले आता ‘हिंदी बिग बॉस’मध्ये घालणार धुमाकूळ

Bigg Boss 15 wild card contestant abhijeet bichukle
Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले पुन्हा 'बिग बॉस'मध्ये घालणार राडा

सुपरहिट रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधील वादग्रस्त व्यक्तीमत्त्व अभिजीत बिचुकले प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज झाला आहे. नेहमी चर्चेत असणार अभिजीत बिचुकले मराठीनंतर आता ‘हिंदी बिग बॉस १५’ मध्ये धुमाकूळ घालणार आहे. येत्या ‘वीकेंड का वार’मध्ये बिचुकले रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्यसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे. सलमान खानच्या शोमध्ये येण्यापूर्वी अभिजीत बिचकुलेने मराठी बिग बॉसमध्ये तुफान कल्ला केला होता.

मात्र शोदरम्यानचं स्पर्धक अभिजीत बिचुकलेला एका प्रकरणात पोलीसांनी अटक केली होती. त्यामुळे बिचुकले काही दिवस तुरुंगात होता. चेक बाउंस प्रकरणात अभिजीत बिचुकलेला ही अटक झाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला चक्क मराठी बिग बॉसच्या सेटवर येऊन अटक केली. परंतु अभिजीत बिचुकलेबद्दल हिंदी बिग बॉसमधील स्पर्धकांना काहीच माहिती नाही. त्यामुळे बिचकुले या स्पर्धकांसोबत काय गोंधळ घातलतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

अभिजीतविरोधात सातारा कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. ज्या प्रकरणात बिचुकलेला अटक झाली होती ते प्रकरण २०१५ मधील होते. दिलेल्या तारखेत कोर्टात हजर न झाल्याने त्याला अटक झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे अभिजीत बिचुकले याने नगरपालिका निवडणुकीपासून ते अगदी विधानसभा, लोकसभा निवडणुसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र कोणत्याही निवडणुकीत तो जिंकू शकला नाही. परंतु बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले हे व्यक्तिमत्व आपल्या वाईट भाषेसाठी आणि जबरदस्त गोंधळ करण्यासाठी ओळखले जात होते. त्यामुळे सलमानच्या हिंदी बिग बॉसमध्ये अभिजीत बिचुकले काय कमाल करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.