Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री केलेला अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह

अभिजित बिचुकलेंच्या वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर प्रेक्षकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या

Bigg Boss 15 wild card entry abhijeet bichukale corona positive
Bigg Boss 15 wild card entry abhijeet bichukale corona positive

बिग बॉस १५मध्ये सध्या एकाहून एक धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री पहायला मिळत आहेत. मराठी बिग बॉसच्या सीझन २मध्ये हंगामा करणारे अभिजीत बिचुकले बिग बॉस१५मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली. मात्र बिग बॉसच्या घरात एंट्री करताच अभिजीत बिचुकलेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्या आता अभिनेत्री राखी सावंत हिची वाइल्ड कार्ड एंट्री मेकर्स करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिजीत बिचुकलेंनंतर अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलीना यांची एंट्री होणार होती मात्र राखीच्या एंट्रीमुळे त्यांची एंट्री लांबणीवर पडली आहे.

 

अभिजीत बिचुकलेंना कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स पाळून येत्या सोमवारी बिग बॉसच्या घरात एंट्री देण्यात येणार होती.मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री रश्मी देसाई,देवोलिया आणि राखी सावंतला देखीला क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळण्यासाठी पुढील काळात थोडा उशिर होण्याची शक्यता आहे.

अभिजीत बिचुकलेचे सलमान खानने बिग बॉसच्या मंचावर स्वागत केले. त्यावेळी अभिजीत बिचुकलेंनी सलमान खानशी फार वेळ गप्पा मारल्या. अभिजित बिचुकलेंच्या वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर प्रेक्षकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या.

मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व अभिजीत बिचुकलेंनी गाजवले होते. मात्र त्यावेळी देखील काही कायदेशीर गोष्टींमुळे बिचुकले काही वेळ घराबाहेर गेले होते. यामुळे त्यांच्या बिग बॉस प्रवासावर मोठा परिणाम झाला होता. तर आता बिग बॉस १५मध्ये एंट्री करताच बिचुकलेंना कोरोनाची लागण झाली आहे. इथे देखील बिचुकलेंच्या हाती निराशाच आली असे म्हणावे लागेल.

बिग बॉसमध्ये सध्या बॉटम ६ स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. आज आणि उद्याच्या एपिसोडमध्ये यातून दोन स्पर्धक घराबाहेर जाणार आहेत. बिग बॉस ओटीटी सीझन संपल्यानंतर त्यातील अनेक स्पर्धकांना बिग बॉस १५मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली आहे.


हेही वाचा – …म्हणून निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पाय धरुन मागितली माफी