Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाश ठरली ‘बिग बॉस 15’ ची विनर

रविवारी 30 जानेवारीला बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले पार पडला. या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित करण्यात आले, तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात आलं. या 'बिग बॉस 15' चा विजेता कोण ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले होते. या शोच्या शेवटच्या टप्प्यांत अटीतटीची सामना पाहायला मिळाला. अखेर टिव्ही सिरियलची लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सर्वाधिक मतांनी बिग बॉस 15' ची विनर ठरली.

Bigg Boss 15 Winner: Bright light turned out to be the winner of 'Bigg Boss 15'
Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाश ठरली 'बिग बॉस 15' ची विनर

रविवारी 30 जानेवारीला बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले पार पडला. या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित करण्यात आले, तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात आलं. या ‘बिग बॉस 15′ चा विजेता कोण ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले होते. या शोच्या शेवटच्या टप्प्यांत अटीतटीची सामना पाहायला मिळाला. अखेर टिव्ही सिरियलची लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सर्वाधिक मतांनी बिग बॉस 15’ ची विनर ठरली. 30 जानेवारीला पार पडलेल्या ‘बिग बॉस 15’ चा ग्रँड फिनालेमध्ये शोचे 5 फायनलिस्ट स्पर्धक करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, निशांत भट्ट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. सर्वप्रथम, शोमधील 10 लाखांचे बक्षीस घेऊन निशांतन शोमधून बाहेर पडला. त्यानंतर शमिता शेट्टी टॉप-3 मधून बाहेर पडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

फिनालेला रंजक करण्यासाठी ‘या’ एस्ट विनर्सची एंट्री

सीझन 15, सीझन 4 ची विजेती श्वेता तिवारी, सीझन 8 ची विजेती गौतम गुलाटी, सीझन 6 ची विजेती उर्वशी ढोलकिया, सीझन 7 ची विजेती गौहर खान आणि सीझन 14 ची विजेती रुबिना दिलीक यांचा समावेश होता. ग्रँड फिनालेची सुरुवात सलमान खानच्या धमाकेदार डान्सने झाली, त्याने ‘सीटी मार’ या गाण्यावर डान्स केला.

सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून सलमान भावूक झाला

शोमध्ये आलेल्या माजी विजेत्यांसह बिग बॉस 15 च्या काही स्पर्धकांसोबत डान्स स्पर्धा झाली. नाही, दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे त्यासोबत शहनाज गिलही शोमध्ये आल्या होत्या आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची आठवण करून ती आणि सलमान खान दोघेही भावूक झाले.

तेजस्वीला एक मोठी ऑफर मिळाली

यंदाचे ‘बिग बॉस 15’ हे सीजन मोठ्या प्रमाणात गाजले आहे. यातील बिग बॉस 15’च्या सदस्या तेजस्वी प्रकाश पूर्ण सीजनमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. तेजस्वीने घरातील प्रत्येक टास्क व्यवस्थितरित्या पार पाडला आहे. मात्र, आता हे सीजन संपण्याअगोदरच तेजस्वीला एक मोठी ऑफर मिळाली. सुत्रांच्या माहितीनुसार, तेजस्विनी लवकरच अभिनेत्री एकता कपूरसोबत एका सीरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला ‘नागिन’ च्या सहाव्या सीजनसाठी विचारले आहे. तेजस्वीने ‘बिग बॉस 15’ मध्ये आपल्या दमदार खेळीने आणि याअगोदर छोट्या पडद्यावरील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

….यासांरख्या शोमधून तेजस्वीला लोकप्रियता मिळाली

एका वृत्तानुसार, अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि अभिनेत्री महक चहल आधीपासूनच या ‘नागिन’ शोमध्ये आहेतच.आता त्यांच्यासोबत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश काम करताना पाहायला मिळणार आहे. याअगोदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अनेक टिव्ही सिरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने ‘स्वरगिनी-जोडे रिश्तो के सुर’ या टिव्ही सिरीयलमधून छोट्या पडद्यावर काम केले होते. तेजस्वीने ‘पहरेदार पिया की’, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ और पौराणिक शो ‘कर्णसंगिनी’ यासांरख्या शोमधून तेजस्वीला लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती खतरो का खिलाडीच्या 10 व्या सीजनचा हिस्सा होती. नागिन सिरीयल ही छोट्या पडद्यावरील एक हिट सिरीयल होती. सगळ्यात पहिले या शोमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने प्रसिद्धी मिळवली आहे.


हे ही वाचा – मराठी शाळा टिकल्या तर दुकानांवरील पाट्या ‘वाचतील’