घरमनोरंजनBigg Boss 4: 'हे' सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात होणार...

Bigg Boss 4: ‘हे’ सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात होणार सहभागी

Subscribe

बिग बॉस मराठीच्या घरात मराठी मालिकांमधील काही कलाकारांची नावे पुढे आली आहेत. मराठीत छोटा पडदा गाजवलेले काही सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात झळकणार आहेत.

बिग बॉस मराठी(bigg boss marathi – 4) हा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाला खूप मोठा प्रेक्षकवर्ग सुद्धा आहे. या कार्यक्रमाची चाहते सुद्धा जास्त आहेत. या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्येही मोठया प्रमाणावर उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी ४ मध्ये होस्टच्या भूमिकेत महेश मांजरेकर(mahesh manjrekar) यांच्या ऐवजी सिद्धार्थ जाधव(siddharth jadhav) होस्टच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु होती.

- Advertisement -

अशातच या कार्यक्रमात बिग बॉसच्या(bigg boss marathi – 4) घरात कोणते सदस्य सहभागी होणार आहेत याची सुद्धा चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मराठी मालिकांमधील काही कलाकारांची नावे पुढे आली आहेत. मराठीत छोटा पडदा गाजवलेले काही सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात झळकणार आहेत.

 

- Advertisement -

१) शुभांगी गोखले(shubhangi gokhale) – मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शुभांगी जोशी. बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात शुभांगी गोखले सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

२) हार्दिक जोशी(hardik joshi) – तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घरातघात पोहोचला पोहोचलेला राणा दादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सुद्धा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसणार असल्याची शक्यता आहे.

३) कार्तिकी गायकवाड(kartiki gaikwad) – गायिका कार्तिकी गायकवाड सुद्धा बिग बॉस मराठी ४ मध्ये झळकणार असल्याची चर्चा होत आहे. कार्तिकी गायकवाड तिच्या पतीसोबत म्हणजेच रोनित पिसे सोबत सध्या थायलंड मध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय.

४) माधव अभ्यंकर(madhav abhyankar) – रात्रीस खेळ चाले या मालिकेतून अण्णा नाईक ही भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांचे नाव सुद्धा बिग बॉस मराठीच्या आगामी पर्वात स्पर्धक म्हणून घेण्यात येत आहे. अण्णा नाईक ह्या व्यक्तिरेखेने माधव अभ्यंकर यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवून दिली.

५) प्राजक्ता गायकवाड(prajakta gaikwad) – स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अभिनेत्री प्राजक्ताच्या बाबतीतही मागिल वर्षी कॉंट्रोव्हर्सी झाली होती.

६) अनिकेत विश्वासराव(aniket vishwasrao) – मालिका आणि चित्रपटात भूमिका करत अभिनेता अनिकेत विश्वासराव याचं नाव सुद्धा बिग बॉस मराठी ४ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. अनिकेत विश्वासराव मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.


‘मराठी चित्रपटांचे प्रेक्षक कुठे आहेत? ते तर दाक्षिणात्य चित्रपट पाहतात’, महेश मांजरेकरांचं वक्तव्य

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -