घरताज्या घडामोडीबिगबॉस फेम प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बिगबॉस फेम प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Subscribe

वैशालीला चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले

आपल्या मधुर स्वरांनी श्रोत्यांच्या मनात जागा करणारी प्रसिद्ध गायिका वैशाली माडे हिने राजकारणात एन्ट्री केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपल्या हातात घड्याळ बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंभी अजित पवार यांनी वैशाली माडेचे पक्षात स्वागत केले आहे. वैशालीला चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे. वैशाली माडेचा पक्षप्रवेश यापुर्वीच ठरला होता परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजारपणातून बरे झाल्यावर विश्रांती घेत होते यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

प्रसिद्ध गायिका वैशाली माडे हीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि इतकर पदाधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. वैशाली माडे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

वैशाली माडे यांची कारकिर्द

मराठ मोळ्या वैशाली माडे हीने मराठी आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. हिंदी चित्रपट बाजीराव मस्तानी मध्ये पिंगा गाणे वैशालीने गायले होते या गाण्यासाठी वैशालीला अनेक पुरस्कार मिळाले होते. वैशाली मराठी बिगबॉस या कार्यक्रमात देखील सहभागी होती. बिगबॉसच्या कार्यक्रमातून वैशाली माडे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहचली होती. अनेकांना वैशालीचा बिगबॉसमधील खेळ पसंतीला पडला होता. वैशालीने मराठा चित्रपटांत देखील अनेक गाणी गायली आहेत. “सारेगमप” या मराठी संगीत स्पर्धेची विजयी आहे. यानंतर हिंदी सारेगमप या कार्यक्रमात देखील वैशाली सहभागी झाली आणि या कार्यक्रमाची विजेतेपद वैशाली माडेने पटकावले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -