Rula Deti Hai : तेजस्वी प्रकाश करण कुंद्राच्या गाण्याचं पोस्टर रिलीज

बिग बॉसमध्ये करण आणि तेजस्वीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांनी देखील दोघांनी सपोर्ट करत प्रेमाचा वर्षाव केला. आता रुला देती है त्यांचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Bigg Boss Fame Tejaswi Prakash Karan Kundra Rula Deti Hai song Poster release
Rula Deti Hai : तेजस्वी प्रकाश करण कुंद्राच्या गाण्याचं पोस्टर रिलीज

Rula Deti Hai : बिग बॉस फेम करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या हटके आणि फेमस जोडीने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास सप्राइज आणले आहे. दोघांचे ‘रूला देती है’ हे नवीन रोमँटिक गाणे येत्या ३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान आज या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये तेजस्वी प्रकाश यांच्या चेहऱ्यावर हसू नसलेले फोटो पाहायला मिळत आहेत. बिग बॉस १५नंतर तेजस्वी आणि करण यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.

बिग बॉसमध्ये करण आणि तेजस्वीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांनी देखील दोघांनी सपोर्ट करत प्रेमाचा वर्षाव केला. आता रुला देती है त्यांचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘करण आणि मी एकमेकांसोबत काम करण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आमची आतुरता अखेर संपली असून आम्ही रुला देती है या गाण्याच्या माध्यमातून एकत्र काम करु शकलो. हे गाणे मनाला स्पर्शून जाणारे आहे तुम्हाला ही ते नक्कीच आवडेल’, अशी प्रतिक्रिया तेजस्वीने दिली आहे.

रुला देती है हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. तेजस्वी सोबत हे माझे पहिले काम आहे. रजतने गाण्याला फार सुंदर संगीत दिले आहे. तर यासरने आपल्या मधुर आवाजाने गाण्यात जीव ओतला आहे. गोव्यात शुट झालेले हे गाणे लवकरच भेटायला येणार आहे, अशी प्रतिक्रिया करण कुंद्राने दिले आहे.

रुला देती हे गाण राणा सोतलने लिहिले आहे तर यासर देसाईने गायले आहे. रजत नागपालने गाण्याचे संगीत दिले आहे. एक सॅड आणि रोमँटिक गाण्याचे हे कँम्बिनेशन आहे. गाण्याचे संपूर्ण शुटींग हे गोव्यात झाले. ३ मार्च रोजी हे गाणे म्युझिक फॅक्टरी या यूट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहे.


हेही वाचा –  ‘अच्छा जी मैं हारी चली’ म्हणत माधुरीचा रेट्रो साँग व्हिडीओ व्हायरल