Trupti desai: नियमांचे पालन केले, अखेर कोरोनाने गाठलेच – तृप्ती देसाई

घराबाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई जोमाने कामाला लागल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी बिग बॉसच्या घरात पुन्हा हजेरी देखील लावली होती. बिग बॉस मराठी ३ च्या फायनलमध्ये देखील तृप्ती देसाई दिसल्या होत्या. या काळात त्या अनेक जणांचा संपर्कात आल्या होत्या. त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली.

bigg boss fame trupti desai corona positive
Trupti desai: नियमांचे पालन केले, अखेर कोरोनाने गाठलेच - तृप्ती देसाई

सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3)  घरात ताईगिरी करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Trupti desai Corona Positive )   तृप्ती यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले आहे. आपण पाहिले तर तृप्ती देसाई या नियमांच्या बाबतीत फार शिस्तीच्या आहेत. बिग बॉसच्या घरात ही त्यांचा हा स्वभाव सर्वांना पहायला मिळाला. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्या कोरोनाचे नियम पाळत होत्या मात्र नियम पाळूनही त्यांना कोरोना लागण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे तृप्ती देसाईंनी सर्वाना कोरोना नियमांचे पालन करण्याच आवाहन देखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Trupti Desai (@truptidesai20)


तृप्ती देसाईंनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘अखेर कोरोनाने मला गाठले. मी कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती अनेक चाहत्यांना भेटली होती. परंतु मी नियमांचे पालन करत होते. मात्र जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मी कोणालाही भेटले नाही’, असे तृप्ती देसाईंनी म्हटले आहे. ‘माझी तब्येत उत्तम उत्तम असून काळजी करू नये. सर्वांनी स्वत:ची काळजी द्या आणि सरकारच्या सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा’, असे आवाहन तृप्ती देसाईंनी त्यांच्या चाहत्यांना केले आहे.

आपण पाहिले तर बिग बॉस मराठी ३ च्या घरात तृप्ती देसाईंच्या ताईगिरीचा सर्वांनीच अनुभव घेतला. घराबाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई जोमाने कामाला लागल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी बिग बॉसच्या घरात पुन्हा हजेरी देखील लावली होती. बिग बॉस मराठी ३ च्या फायनलमध्ये देखील तृप्ती देसाई दिसल्या होत्या. या काळात त्या अनेक जणांचा संपर्कात आल्या होत्या. त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली.

बिग बॉस मराठी३ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या तृप्ती देसाई या पहिल्याच स्पर्धक आहे. घरातून बाहेर आलेल्या कोणत्याही स्पर्धकाला आजवर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले नाही. तृप्ती देसाई कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समजल्यावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी ताई लवकर बऱ्या व्हा असे म्हणत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

बिग बॉसच कोरोना पॉझिटीव्ह 

तर दुसरीकडे हिंदी बिग बॉसमध्ये बिग बॉसनाच कोरोना लागण झाली झाल्याची माहिती समोर येत आहे. हिंदी बिग बॉसमध्ये बिग बॉसचा आवाज देणारा अतुल कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता हिंदी बिग बॉस बंद होणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


हेही वाचा – Coronavirus : अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण