घरमनोरंजनही कळी ‘बिग बॉस’च्या घरात खुलणार?

ही कळी ‘बिग बॉस’च्या घरात खुलणार?

Subscribe

'खुलता कळी खुलेना' मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिला बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यासाठी विचारणा केली होती. ही कळी ‘बिग बॉस’च्या घरात खुलणार का हे पाहाव लागणार आहे.

सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’. बिग बॉसमराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच ‘बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व’ सुरू होणार आहे. वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या सगळ्यांमध्ये हिच चर्चा रंगताना दिसत असताना ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे नाव जरा सध्या चर्चेत आले आहे. तिला ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वासाठी विचारणा झाल्याचे समजते. परंतु, या अफवा असल्याचे सांगत मयुरीने याविषयी मौन सोडले आहे.

- Advertisement -

काय म्हणाली मयुरी

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या मयुरीचे नाव चर्चेत आले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता हे खरं आहे. परंतु, ‘मी या शोमध्ये सहभागी होणार नाही. मला वाटते मी या शोसाठी योग्य व्यक्ती नाही. मला माझं खासगी आयुष्य शांतपणे जगायला आवडते. माझ्या खासगी आयुष्यातील गोष्टी मी लोकांशी शेअर करत नाही. शिवाय, बिग बॉसच्या तारखा आणि माझ्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सारख्याच असल्याने मला होकार देणे शक्य नव्हते’, असं ती म्हणाली आहे.


वाचा – म्हणून बिग बॉस मराठीचं घर नसणार लोणावळ्यात

- Advertisement -

वाचा – ‘बिग बॉस मराठी २’ चं सुत्रसंचालन करणार हा आघाडीचा दिग्दर्शक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -