घरमनोरंजनबिग बॉसच्या घरात सदस्य ठरवणार आपली किंमत!

बिग बॉसच्या घरात सदस्य ठरवणार आपली किंमत!

Subscribe

आज घरात बिग बॉस सदस्य एक टास्क देणार आहेत. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला आपली किंमत ठरवायची आहे. यात सगळ्यात जास्त सहा लाख या किंमतीवर किशोरी ताई, विणा आणि शीव यांनी हक्क दाखवला. आता घरातील सदस्यांनी एकत्र चर्चा करत यावर निर्णय घ्यायचा आहे.

बिग बॉस मराठी सिझन 2 च्या अंतिम फेरीत नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांनी आपले स्थान निश्चित आहे. या कार्यात नेहाला ९ पैकी ८ आणि शिवानीला ९ पैकी ५ मत मिळवून फिनाले मध्ये पोहचल्या आहेत. सिझन 2 चे हे शेवटचे नॉमिनेशन कार्य आहे अशी घोषणा बिग बॉस यांनी केली यानंतर सगळेच सदस्य भावुक झाले. या आठवड्यात आरोह, किशोरी, वीणा आणि शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत, पण मतदान प्रक्रिया बंद आहेत.

- Advertisement -

आज घरात बिग बॉस सदस्य एक टास्क देणार आहेत. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला आपली किंमत ठरवायची आहे. यात सगळ्यात जास्त सहा लाख या किंमतीवर किशोरी ताई, विणा आणि शीव यांनी हक्क दाखवला. आता घरातील सदस्यांनी एकत्र चर्चा करत यावर निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक सदस्याला या स्पर्धेतील स्वत:चे मूल्य दिलेल्या मुद्रांमधून ठरवायचे आहे. परंतु शेवटचे मूल्य हे सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठरवायचे आहे… आता हे ठरवताना सदस्यांमध्ये वाद विवाद होणार हे निश्चित.

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात काल नेहा आणि शिवानीला थेट फिनालेमध्ये प्रवेश मिळाला. घरात या आधी आऊट झालेले सदस्य आले आणि त्यांनी नेहाला सेव्ह केलं. हा निर्णय घरातील सदस्यांनी मान्य केला. पण या निर्णयाचे सोशलमिडीयावर मात्र उलटे पडसाद उमटले. एकवेळा नेहा सेफ झाले हे ठिक आहे पण शिवानीला सेफ करण चुकीच आहे अशाच प्रतिक्रिया सोशलमिडीयावर येऊ लागल्या. नेहा आणि शिवानी पेक्षा शिव आणि विणा फिनालेसाठी खरे उमेदवार आहेत असे जनतेचे म्हणणे पडले. तर काहींनी तर शिवानीला जिंकवण्यासाठी मुद्दामूद आऊट सदस्याकडून हे नॉमिनेशन कार्य करवून घेतले असे आरोप बिग बॉसवर केले आहेत. नेहा आणि शिवानी जरी फिनालेला गेले असतील तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र शिव आणि वीणाच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -