घरमनोरंजन शिव –वीणाच्या लग्नाला शिवच्या आईचा विरोध?

 शिव –वीणाच्या लग्नाला शिवच्या आईचा विरोध?

Subscribe

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा अमरावतीचा शिव ठाकरे हा विजेता ठरला. शिवला पर्वाच्या पहिल्या आठवड्यापासून प्रेक्षकांची पसंती मिळाली. टास्क खेळण्याबरोबरच शिव आणखी एका गोष्टीमुळे प्रेक्षकांचा लाडका बनला ते म्हणजे त्याचा प्रमाणिकपणा आणि दिलखुलास प्रेम करण्याची पध्दत. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाप्रमाणेच आणखी गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ती म्हणजे शिव-वीणाची लव्ह स्टोरी. त्यांच्या लव्हस्टोरीला घरातील सदस्यांनी,प्रेक्षकांनी पसंती दिली असली तर शिवच्या आईला मात्र वीणा पसंत नाही असच दिसतय.

वीणाला बहिण मानायचा सल्ला

काल झालेल्या विकेंडच्या डावात पुन्हा एकदा शिवच्या आईने विणाला बहिण न मानल्यामुळे नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. घरातील इतर सदस्यांप्रमाणे शिवने वीणाला आपली बहिण  मानावी असा सल्ला त्याच्या आईने त्याला दिला होता. मात्र शिवने आपल्या आईने दिलेला सल्ला ऐकला नाही. त्यामुळे काल फिनालेमध्ये मांजरेकरांनी लग्न कधी करणार या प्रश्नावर उत्तर देताना या गोष्टीला अजून वेळ आहे. मी शिवला वीणाला बहिण मानायचा सल्ला दिला होता. पण शिवने तो ऐकला नाही असे उत्तर दिले.

- Advertisement -

या आधी जेव्हा शिवची आई आणि बहिण बिग बॉस मराठीच्या घरात आली होती. त्यावेळी त्या दोघींनी शिवला विणालाही बहिण मान, घरात खेळाकडे लक्ष दे. असा सल्ला दिला होता. त्यावेळी शिवने होकारार्थी मान हलवली असली तरी त्याने तो सल्ला पाळला नाही.

शिवच्या आईच्या नकाराला मांजरेकारांचे उत्तर

शिवच्या आईने वीणाला बहिण मान हे पुन्हा एकदा सांगितल्यामुळे शिव नाराज झाला. जीच्यावर पण प्रेम केलं तीला बहिण कसं मानणार? यावेळी मांजरेकरांनी शिवला एक खास उपाय सांगितला. महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली लांबच्या भावा- बहिणींनी लग्न केलेली चालतात. त्यामुळे आता वीणाला बहिण मानलस तरी तू  लग्न करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -