घरमनोरंजनघटस्फोट घेतल्यानंतर 'हे' स्पर्धक बिग बॉस मराठी 3 च्या घरामध्ये आले आमने-सामने

घटस्फोट घेतल्यानंतर ‘हे’ स्पर्धक बिग बॉस मराठी 3 च्या घरामध्ये आले आमने-सामने

Subscribe

स्नेहा वाघ डांसर फैजल खानला डेट करत असल्याच्या अनेक बातम्या तसेच चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या

19 सप्टेंबर पासून बिग बॉस मराठीच्या(bigg boss marathi 3) तिसऱ्या पर्वाला धमाकेदार सुरूवात झाली असून 15 स्पर्धंकानी घरामध्ये प्रवेश केला आहे. यंदा बिग बॉसच्या घरात राजकारणी मंडळीपासून ते अगदी कलाकार, किर्तनकार मंडळी देखील झळकत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदाच्या सिझन काहीसा हटके आणि उत्कंठावर्धक असणार आहे हे मात्र नक्की. पण, यावेळेस आणखी एका कारणामुळे बिग बॉस मराठी 3 चर्चेत आहे. घरामध्ये एण्ट्री करणाऱ्या दोन सदस्यांपैकी पूर्वीपासूनच नातं असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. अभिनेत्री स्नेहा वाघ(Sneha Wagh) आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर(Aavishkar Darwhekar) हे दोघेही पती-पत्नी असून यांचा घटस्फोट झाला आहे.(Bigg Boss Marathi 3 Sneha Wagh And Aavishkar Darwhekar Divorce)

अभिनेत्री स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर ‘काटा रुते कुणाला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. वयाच्या 19 व्या वर्षी स्नेहाने आविष्कारसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाच्या अवघ्या काही वर्षातच दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले. इतकचं नाही तर स्नेहाने आविष्कार विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. यानंतर दोघांनी विभक्त होण्याच्या निर्णय घेतला.

- Advertisement -

स्नेहाची आणि आविष्कारची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एण्ट्री होताच दोघांमध्ये काहीसे नाराजीचे भाव दिसून आले होते. मात्र काही दिवस एकत्र राहील्यानंतर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री खुलून येते का? की एमेकांमधील वाद पुन्हा उफाळणार?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी स्नेहा वाघ डांसर फैजल खानला डेट करत असल्याच्या अनेक बातम्या तसेच चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या मात्र स्नेहाने याबाबत अद्याप अधीकृतपणे काहीही खुलासा केला नाहीये.


हे हि वाचा – रेमो डिसूजाने शेअर केला पत्नी लिझेलचा ट्रांसफॉर्मेशन फोटो म्हणाला, तुझ्यावर गर्व आहे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -