घरमनोरंजनBigg Boss Marathi 3 : २ घटस्फोट, ११ वर्ष लहान डान्सरसोबतच्या अफेअरमुळे...

Bigg Boss Marathi 3 : २ घटस्फोट, ११ वर्ष लहान डान्सरसोबतच्या अफेअरमुळे स्नेहा वाघ चर्चेत

Subscribe

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघने नुकताच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये एंट्री घेतली. स्नेहा बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत होती. अशातच तिने बिग बॉस शोमध्ये येताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. शोदरम्यान स्नेहाने तिच्या दोन अयशस्वी लग्नांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहे. विशेष म्हणजे तिचा पहिला पती अविष्कार दारवेकर देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

बिग बॉस शो’ दरम्यान, स्नेहा, तिच्या दोन्ही अयशस्वी लग्नांचा उल्लेख करताना म्हणाली की, तिला असे वाटते की पुरुषांना मानसिकदृष्ट्या मजबूत महिला आवडत नाहीत. टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने तिच्यावर शो दरम्यान घटस्फोटाबद्दल बोलल्याबद्दल व्हिक्टीम कार्ड खेळल्याचा आरोप केला आहे. काम्याने ट्विट केले की, ती अशा प्रकारे बोलून या गेमला वाईट बनवत आहे.

- Advertisement -

अशातच तिच्या दोन अयशस्वी लग्नाव्यतिरिक्त स्नेहाचं ११ वर्षांनी लहान नच बलिए 9 चा (Nach Baliye 9) स्पर्धक राहिलेल्या फैजल खानसोबत (Faisal Khan) अफेअर असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र या चर्चा दोन्ही बाजूंनी केवळ अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

स्नेहा वाघ हिंदीसह मराठी- टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षापासून स्नेहाने मराठी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. स्नेहा ‘अधुरी एक कहाणी’ या मराठी मालिकेतही दिसली आहे. त्यानंतर ती हिंदी सिनेमाकडे वळला. तिने इमॅजिन टीव्हीच्या शो ‘ज्योती’ मधून प्रेक्षकांवर छाप पाडली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत ‘मुरा’ची भूमिका साकारली आणि नंतर ती ‘वीरा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली.

- Advertisement -

वयाच्या १९ व्या वर्षी स्नेहाने अभिनेता आविष्कार दारव्हेकरसोबत तिचा विवाह केला; मात्र या नात्यातील शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. यानंतर तिने २०१५ मध्ये इंटीरिअर डिझायनर अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं; मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर 8 महिन्यांतच ती त्याच्यापासून वेगळी झाली.


दाढी असलेला, फ्लर्ट, किस करणारा पुरुष मला आवडतो, मलायकाने केला खुलासा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -