घरताज्या घडामोडीBigg Boss Marathi 3: पहिल्याच आठवड्यात 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss Marathi 3: पहिल्याच आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

Subscribe

टेलिव्हिजनवर अनेक रिअॅलिटी शो असतात. पण त्यापैकी सर्वाधिक पाहिला जाणार आणि चर्चेत असणार रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस शो हा हिंदी, मराठीसह इतरही भाषेत आहे. यंदा पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटी शो देखील पाहायला मिळाला. त्यानंतर लवकरच बिग बॉस सीझन १५ सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मराठी बिग बॉस सीझन ३ सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही दमदार सदस्य घेऊन मराठी बिग बॉस सीझन ३ला रविवारपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील १५ सदस्यांमध्ये वाद होताना दिसत आहे. काल, सोमवारी दुसऱ्या दिवशी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. पहिल्याच आठवड्यात ११ सदस्य घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

काल, सोमवारी बिग बॉसच्या घरात टाकाऊ की टिकाऊ हा टास्क पार पडला. गार्ड एरियामधील स्विमिंग पूलजवळ हा टास्क पार पडला. प्रत्येकी एका सदस्याने दोन इतर सदस्यांना निवडणे आणि त्यामधील टाकाऊ कोण आणि टिकाऊ कोण याचे कारण सांगून, टाकाऊ असलेल्या व्यक्तीला स्विमिंग पूलमध्ये ढकलणे, असा पहिला नॉमिनेशन टास्क होता. त्यानुसार टास्क पार पडला आणि घरातील चार सदस्य नॉमिनेट झाले नाहीत.

पहिल्याच आठवड्यात ११ सदस्य झाले नॉमिनेट

  • विशाल निकम
  • उत्कर्ष शिंदे
  • संतोष चौधरी
  • विकास पाटील
  • अविष्कार नार्वेकर
  • मीरा जगन्नाथ
  • शिवलीला पाटील
  • मीनल शहा
  • गायत्री दातार
  • तृप्ती देसाई
  • स्नेहा वाघ

टास्क दरम्यान दादूस विसरला घरातील सदस्याचं नाव 

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात दुसऱ्या दिवशी काय झाले? पाहा…

मीरा – जयमध्ये झाले कडाक्याचे भांडण / Bigg boss marathi 3 frist day

बिग बॉस मराठी सीझन-३ ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली… स्पर्धक कोण असतील ? घर कसे असेल? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती.आणि काल संध्याकाळी ७ वाजता या सगळ्या प्रश्नांवरून पडदा उघडला. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली. स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एन्ट्री झाली. याशिवाय तरुण कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांचीदेखील एन्ट्री झाली. सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सीझन-३ च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक-एक करून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले. बिग बॉस मराठीचं अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जय मध्ये होणार भांडण. तसंच मीरा आणि स्ंनेहामध्ये बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय मला डोकं आहे”. तर स्नेहाने मीराला खडसावलं “ही काय पध्दत आहे का बोलायची”? घरात झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो सगळेच चर्चेत असणार आहे. मीरा आणि स्नेहा तसेच मीरा आणि जयमध्ये वाद कशा वरून झाला ? पुढे काय झालं ? हे आजच्या भागात कळेल.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, September 20, 2021

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -