‘बिग बॉस मराठी 4’ च्या घरात ‘या’ कलाकारांची एन्ट्री, पाहा स्पर्धकांची पूर्ण लिस्ट

छोट्या पडद्यावरील सुपरहिट रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी 4’ ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. ऑल इज वेल म्हणत अभिनेते आणि शोचे होस्ट महेश मांजरेकर चौथ्या सीझनचे एक एक ट्विस्ट रिव्हिल करत होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून आज म्हणजे 2 ऑक्टोबर 2022 पासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या नव्याकोऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. मात्र या पर्वात नेमके कोणते कलाकार सहभागी होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर कोणते कलाकार सहभागी होणार हे अधिकृतपणे जाहीर झाले आहे. त्यामुळे पाहूयात यंदा बिग बॉस मराठी च्या चौथ्या पर्वात कोणते कलाकार कल्ला करणार ते….

किरण माने

मुलगी झाली हो या मालिमधील अभिनेता किरण माने एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलाच प्रकाश झोतात आला. एका राजकीय पक्षाविरोधातील सोशल मीडिया पोस्टमुळे अभिनेत्याची शोमधून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून किरण माने सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला. अखेर किरण माने बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये एक वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक म्हणून सहभागी झाला आहे. त्यामुळे किरण माने स्पर्धेत काय कल्ला करतो हे पाहणं रंजक असेल.

अपूर्वा नेमळेकर

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून अनेकांच्या ह्रदयात स्थान निर्माण करणारी प्रेक्षकांची लाडकी शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

अमृता धोंगडे

मराठीतील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री अमृता धोंगडे सुद्धा बिग बॉसच्या घरातून टीव्हीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

प्रसाद जवादे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादे सुद्धा लोकप्रिय रिअॅलिटी शो अर्थात बिग बॉस मराठी 4 मध्ये कल्ला करणार आहे. प्रसाद हा मराठी चित्रपट निर्माता सुद्धा आहे.

मेघा घाटगे

लोकप्रिय मराठी लावणी क्वीन अभिनेत्री मेघा घाटगे बिग बॉस मराठी 4 मध्ये दिसणार आहे. पछाडलेल्या या चित्रपटातून एक अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करणारी मेघा एक सुप्रसिद्ध लोककलाकार देखील आहे.

निखिल राजेशिर्के

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये झळकलेला अभिनेता निखिल राजशिर्के देखील बिग बॉसच्या घरात राडा करण्यास सज्जा झाला आहे. निखिलने अनेक मलिकांमधून आजवर अभिनय केला आहे.

अक्षय केळकर

मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता अक्षय केळकर सुद्धा बिग बॉस मराठी 4 मधील स्पर्धक आहे.

रुचिरा जाधव

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रुचिर जाधव ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. या मालिकेत अभिजीत खांडकेकरसोबत तिने मायाची भूमिका साकरली होती. ज्या भूमिकेला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले. अखेर रुचिरा आता बिग बॉस मराठी 4 मधून प्रेक्षकांचे अजून मनोरंजन करण्य़ास सज्ज झाली आहे.

समृद्धी जाधव

हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील Splitsvilla X3 या शोमुळे समृद्धी जाधव ही प्रकाश झोतात आली. समृद्धी ही एक सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या रील आणि व्हिडिओंद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करायला आवडते. आता ती बिग बॉसमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

तेजस्विनी लोणारी


मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तेजस्विनी लोणारी हिला ओळखले जाते. ती फारशा सिनेमांमधून दिसलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिची फारच क्रेझ दिसते. दक्षिण भारतीय सिनेमांमधून करियरला सुरुवात करणारी तेजस्विनी ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ मराठी सिनेमात झळकली. त्यानंतर आता ती देवमाणूस मालिकेतही काम करत होती. तेजस्विनीने मराठी सिनेमे कमी केले असले तरीही तिने बर्नी, चिनू, नो प्रॉब्लेम इन यासारख्या अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

यशश्री मसुरकर

यशश्री

यशश्री मसुरकर ही अभिनेत्री देखील बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. यशश्रीने मराठी टेलिव्हिजनसह हिंदी मालिकांमध्येही मुख्य भूमिका केल्या आहेत. ‘लक्ष्मणरेषा’, ‘रंग बदलती ओढनी’ या गाजलेल्या मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. आता ती बिग बॉस मराठी 4 मधून पुन्हा टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.


विजय सेतुपतिच्या ‘गांधी टॉक्स’मध्ये मराठमोळा सिद्दार्थ जाधव झळकणार