HomeमनोरंजनBigg Boss Marathi : बाईईई हा काय प्रकार? Bigg Boss मराठी 5...

Bigg Boss Marathi : बाईईई हा काय प्रकार? Bigg Boss मराठी 5 पुन्हा टेलिकास्ट होणार

Subscribe

मालिका विश्वातील रिऍलिटी शो या श्रेणीत ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे. विविध भाषेतील बिग बॉसच्या प्रत्येक सीजनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. यातील बिग बॉस मराठीचे आतापर्यंत 5 सीजन पूर्ण झाले. शेवटच्या सीजनचे विजेतेपद सुरज चव्हाणने पटकावले. आपल्या साधेपणातून त्याने प्रेक्षकांची मन आणि बिग बॉस सीजन 5 ची ट्रॉफी जिंकली. येत्या काळात त्याचा मराठी चित्रपटसुद्धा येतोय. दरम्यान, प्रेक्षक बिगबॉसच्या आगामी सीजनची आतुरतेने वाट पाहत असताना बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन पुन्हा टेलिकास्ट केला जाणार आहे. यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे, जाणून घेऊया. (Bigg Boss Marathi 5 going to telecast again)

कधी सुरु होणार?

बिग बॉस मराठीचे पहिले पाचही सीजन जबरदस्त हिट झाले. यानंतर आता लवकरच या शोचा सहावा सीजन येईल अशी अपेक्षा होती. मात्र, बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन पुन्हा एकदा टेलिकास्ट करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. येत्या 10 फेब्रुवारी 2025 पासून बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन पुन्हा एकदा सुरु होतो आहे. एकीकडे नव्या सीजनची प्रतीक्षा केली जातेय आणि दुसरीकडे वाहिनीने जुना सीजन पुन्हा टेलिकास्ट करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पुन्हा भाऊचा धक्का

दोन दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कलर्स मराठी घेऊन येत आहे मनोरंजनाचा तडका, पुन्हा एकदा रितेश देशमुखसोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका! पहा, 10 फेब्रुवारीपासून ‘Bigg Boss मराठी’, दररोज दुपारी 3 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हा व्हिडीओ सीजन पाचचा प्रोमो आहे. जो पाहिल्यानंतर रितेशचे चाहते खुश झाले असले तरी शोचे प्रेक्षक मात्र हिरमुसले आहेत. रिपीट टेलिकास्टमधून भले भाऊचा धक्का पहायला मिळेल. पण तोचतोचपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकेच खरे.

प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी नवा सीजन कशी येणार? अशी विचारणा केली आहे. तर एकाने म्हटलंय, ‘हिंदी बिग बॉस आणि सलमान खान च्या पुढे लोटांगण घालून , शो लवकर बंद करणारे तुम्ही …काय मराठी ची लाज ठेवणार’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘हा सीजन बोर होता सीजन पहिला लावा आम्हाला आवडेल बघायला’. अन्य एकाने लिहिलं, ‘खूप गाजला म्हणूनचं सत्तर दिवसांत गुंडाळला’. एकूणच कमेंट्स पाहिल्यावर समजतंय की, प्रेक्षकांना बिग बॉसचा जुना सीजन पुन्हा पाहण्यात काडीचाही रस नाही. मात्र, नवा सीजन कधी येणार? याबाबत उत्सुकता आहे.

हेही पहा –

Old Bollywood Movies : ओल्ड इज गोल्ड, व्हेलेंटाईन वीकमध्ये हे सिनेमे पुन्हा रिलीज होणार