मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे नुकत्याच काही तासांपूर्वी विवाहबंधनात अडकले. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी एकमेकांसोबत लग्न करणार असल्याचा सुखद धक्का चाहत्यांना दिला होता. अमृता आणि प्रसादची जोडी मराठी बिग बॉसमध्ये चाहत्यांनी खूप आवडली होती. घराबाहेर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दरम्यान, आता अमृता-प्रसादच्या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नासाठी अमृता-प्रसादचा मराठमोळा लूक
View this post on Instagram
अमृता आणि प्रसाद शनिवारी विवाहबंधनात अडकले. यावेळी लग्नात सप्तपदी घेताना दोघांनी खास मराठमोळा लूक केला होता. अमृताने गुलाबी रंगाची सुंदर साडी, गळ्यात दागिने, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा खास लूक केला होता तर प्रसादनेही पिवळ्या रंगाचे कुर्ता घातला होता शिवाय वरमाला घालताना अमृताने लाल रंगाचा डिझायनर घागरा घातला होता तर प्रसादने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. दोघंही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.
‘बिग बॉस मराठी 4’ मुळे दोघेही आले एकत्र
‘बिग बॉस मराठी 4’मध्ये अमृता आणि प्रसाद यांची चांगली मैत्री झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जुलै 2023 मध्ये या दोघांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
हेही वाचा :