बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत एन्ट्री

आता येत्या काळात या कानेटकरांच्या कुटुंबामध्ये नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राची भूमिका अभिनेत्रा वीणा जगताप साकारणार आहे

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेला अनेक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेने बऱ्यापैंकी लोकप्रियता मिळवलेली आहे. या मालिकेतील खोडकर, निरागस अपूर्वा आणि शिस्तबद्ध , हुशार शशांक यांची सुंदर केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. आता येत्या काळात या कानेटकरांच्या कुटुंबामध्ये नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राची भूमिका अभिनेत्रा वीणा जगताप साकारणार आहे.

या नव्या पात्राचे नाव मालिकेत अवंतिका कानेटकर चौधरी असं आहे. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी असून तिने प्रेमविवाह केल्यामुळे तिला कानेटकर कुटुंबापासून लांब करण्यात आले होते. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर अवंतिका कानेटकर पुन्हा आपल्या कुटुंबाशी जोडली जाणार आहे.

वीणा जगताप अवंतिकाची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असून स्टार प्रवाहवरची वीणाची ही पहिली मालिका आहे. या मालिकेत काम करण्याबाबत वीणा म्हणाली की, ती ही मालिका नेहमी पाहत होती, त्यामुळे कानेटकर कुटुंबाची ती आधीपासून चाहती आहे. अवंतिकाच्या भूमिके बद्दल सांगायचे झाले तर, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे आणि उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी आहे. तसेच हे पात्र माझ्या स्वभावाशी अगदी मिळते जुळते आहे.

 


हेही वाचा :रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’मध्ये झळकणार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘हा’ अभिनेता