घरमनोरंजनम्हणे हे आहेत 'बिग बॉस मराठी २' चे स्पर्धक; सत्य की एप्रिल...

म्हणे हे आहेत ‘बिग बॉस मराठी २’ चे स्पर्धक; सत्य की एप्रिल फूल

Subscribe

लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे.कलर्स मराठीच्या ऑफिशीएल इन्स्टाग्रामवर बिग बॉस २ च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकांची नावं रिव्हील केली आहेत.

सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’. बिग बॉसमराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नुकतच कलर्स मराठीच्या ऑफिशीएल इन्स्टाग्रामवर बिग बॉस २ च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकांची नावं रिव्हील केली आहेत.

काल रविवारी त्यांनी एक इन्स्टा पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये लिहीलं होतं की १ एप्रिलला बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची नावं जाहीर होणार. त्याचप्रमाणे आज एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात स्पर्धकांचे चेहरे दिसत नाहीयेत. पण त्या स्पर्धकांच्या नावाचे पहिले अक्षर देण्यात आलं आहे. या पहिल्या अक्षरावरून या दुसऱ्या पर्वात कोण कोण कलाकार असणार हे तुम्हाला कळणार आहे.

- Advertisement -

 पहिल्या अक्षरावरून तर्क वितर्क

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या पोस्टवरून बिग बॉस फॅन्सनी कोण कोण कलाकार यात असणार या विषयी तर्क वितर्क लावायला सुरूवात केली आहे. अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनय बेर्डे, अमृता पवार, वैभव मांगले, अधोक्षज कऱ्हाडे, अर्या अमंबेकर, असावरी जोशी असे अनेक पर्याय प्रेक्षकांनी सुचवले आहेत.

- Advertisement -
big boss marathi fans
बिग बॉस मराठीच्या फॅन्स

ही अक्षर खरी कि एप्रिल फूल

आज १ एप्रिल. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फुल करण्याची सगळ्यांनाच हुक्की येते. त्यातच कलर्स मराठीने बिग बॉस मराठी २ च्या स्पर्धकांची नावं आज जाहीर केल्यामुळे ही नावं खरी की एप्रिल फुल केलं आहे. हे लवकरच कळेल.

ही नावं होती चर्चेत

छोट्या पडद्यावरील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केतकी जाणार असं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे रसिका सुनील, सुप्रिया पाठक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. दुसरं पर्व कधीपासून सुरू होणार आणि त्याचं सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -