घरमनोरंजनBigg Boss Marathi : 'बिग बॉस ३' च्या घरात नेत्यांपासून किर्तनकारांची एंट्री,...

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस ३’ च्या घरात नेत्यांपासून किर्तनकारांची एंट्री, हे आहेत १५ स्पर्धक

Subscribe

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त शो मराठी बिग बॉस सिझन ३ ला सुरुवात झाली आहे. सिझन तीनमध्ये यंदा बिग बॉसच्या घरात कलाकारांसह राजकीय नेते, किर्तनकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील ही मंडळी आता बिग बॉसमध्ये धुडगूस घालत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहेत. त्यामुळे आजपासून पुढील ९९ दिवस बिग बॉसच्या घरात स्पर्धांचे भांडण, ड्रामा अन् मनोरंजन पाहायला मिळणार आहे. मात्र या तिसऱ्या सिझनमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अधिक उत्सुकता होती. मात्र रविवारी झालेल्या घोषित केलेल्या अनेक अनपेक्षित कलाकारांना पाहून प्रेक्षकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. चला जाणून घेऊया बिग बॉस मराठी ३ मधील १५ स्पर्धकांची नावे आणि त्यांची ओळख

१) अभिनेत्री सोनाली पाटील

‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरातच सर्वात पहिला प्रवेश करण्याचा मान देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील हीला मिळाला. कोल्हापूरची सोनाली कोणतीही स्ट्रॅटजी न वापरता या खेळात सहभाग होणार असं म्हणाली आहे. देवमाणूस, वैजू नंबर १ या मालिकेसह सोनालीने अनेक मराठी मालिकांमध्ये आजवर काम केलं आहे.

- Advertisement -

२) अभिनेता विशाल निकम

यानंतर दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता विशाल निकम याने बिग बॉसच्या घरात दुसरा स्पर्धक म्हणून एंट्री घेतली.

३) अभिनेत्री स्नेहा वाघ

मराठी मालिकांसह थेट हिंदी मालिका विश्वात आपल्या अभिनयाचा पताका रोवणारी अभिनेत्री स्नेहा वाघ हिनेही ‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात एंट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणारी स्नेहा ही तिसरी स्पर्धक आहे. घरात पोहचताच स्नेहा आणि सोनाली यांची चांगलीच मैत्री झाली.

- Advertisement -

४) गायक उत्कर्ष शिंदे

दमदार, भारदस्त आवाजाने अख्खा महाराष्ट्राला आपल्या गाण्यांवर थिरकायला लावणारा प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदे यानेही ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात प्रवेश केलाय. उत्कर्षही भावाप्रमाणे एक उत्तम गायक आहे.

५) अभिनेत्री मिरा जगन्नाथ

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मोमो ही लोकप्रिय भूमिका साकारणारी अभिनेत्री मिरा जगन्नाथ हीने बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात स्पर्धक म्हणून एंट्री घेतलीय. मीराने घरात येताच बेडवरून वाद घालायला सुरुवात केल्याने इतर सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

६) सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

यानंतर कलाकारांव्य़तिरिक्त शोमध्ये कोण हटके स्पर्धक सहभागी होणाप याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

७) अभिनेता आविष्कार दारव्हेकर 

अनेक मराठी मालिकांसह, नाटक, सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करणारा अभिनेता आविष्कार दारव्हेकर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला आहे.

८) अभिनेत्री सुरेखा कुडची

स्वाभिमान या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाली आहे. आजवर तिने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यात अनेकदा ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसली.

९) अभिनेता विकास पाटील

अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील यानेही ‘बिग बॉस मराठी ३’मध्येही धमाकेदार एंट्री घेतली आहे. नुकताच तो कलर्सवरील बायको अशी हवी मालिकेत झळकला होता.

१०) अभिनेत्री गायत्री दातार

‘तुला पाहते रे’ या मालिकेत इशा निमकरची भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री गायत्री दातार आता बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे. या मालिकेनंतर प्रकाश झोतात आलेली साधी, सरळ गायत्री खऱ्या आयुष्यात कशी आहे हे आता बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.

११) किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील

वयाच्या अवघ्या पाच वर्षांपासून आजवर १० हजारांहून अधिक किर्तनांचा टप्पा पार करणारी किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील हीने बिग बॉसमध्ये एंट्री घेतलीय. शिवलीला तरुणांसाठी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम करते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता शिवलीला किर्तनाच्या जादूने भक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

१२) हिंदी रिअॅलिटी शोमधील स्पर्धक जय दुधाणे

MTV वरील अतिशय लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सविला’मधून लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा चॉकलेट बॉय जय दुधाणे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. स्प्लिट्सविलानंतर आता बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये चॉर्मिंग जयचा गेम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

१३) रोडिजमधील स्पर्धक मीनल शाह

रोडिज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील स्पर्धक मीनल शाह ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सामील झाली आहे. मीनल डिजिटल क्रिएटर आणि डान्सर आहे.

१४) अभिनेता अक्षय वाघमारे

फत्तेशिखस्त फेम अभिनेता अक्षय वाघमारे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. अक्षयने फत्तेशिखस्तसह अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.

१५) गायक संतोष चौधरी

मराठी सिनेविश्वातील बप्पी लहिरी अशी ओळख निर्माण करणारा आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ अर्थात गायक संतोष चौधरीची बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये एण्ट्री झाली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -