Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा सुरू होणार कल्ला

काही महिन्यांनपूर्वीच बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व संपले. विशाल निकम हा तिसऱ्या पर्वाचा विजेता झाला होता. तिसऱ्या पर्वातील अतरंगी कलाकारांनी बिग बॉसच्या घरात चांगलाच धूमाकुळ घातला. त्यामुळे प्रेक्षकवर्ग आता बिग बॉस कार्यक्रमाला खूप मिस करत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे येत्या काळात लवकरच बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होत आहे.

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व येत्या १० जुलैनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जून महिन्यापासून बिग बॉस मराठीचे प्रोमो समोर येतील. या चौथ्या सिझनमध्ये कोण कलाकर असतील आणि काय धुमाकूळ घालतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

बिग बॉस मराठीचे तीन पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. त्यामुळे आता हा चौथा सिझन कोण होस्ट करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या पर्वात अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.