घरमनोरंजनटीव्हीवर माझे पोट सर्कल करुन दाखवले, गायिका नेहा भसीन बॉडी शेमिंगची शिकार

टीव्हीवर माझे पोट सर्कल करुन दाखवले, गायिका नेहा भसीन बॉडी शेमिंगची शिकार

Subscribe

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकतचं नेहाने बिग बॉस ओटीटीमध्ये एंट्री घेतली. नेहा शोच्या सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस स्पर्धकांपैकी एक आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात नेहाची धमाल पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्साही आहेत.अशातच नेहा भसीनने तिच्या आयुष्यातील एक वाईट घटना  शेअर केली आहे. नेहा भसीन अनेकदा बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. या घटनेमुळे नेहा खूपच निराश झाली होती. या घटनेची आठवण करत नेहा भसीनने एका मुलाखतीत सांगितले की, एका टीव्ही चॅनेलने तिचे वाढलेले पोट सर्कल करुन दाखवले होते. मात्र तो व्हिडिओ ऑन एअर केला नाही. कारण ती त्यात खूपच लठ्ठ दिसत होती. त्यावेळी तिचे वजन फक्त ४९ किलो होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)


नेहा पुढे सांगते, तिने जेव्हा घर सोडले तेव्हा ती एक सामान्य मुलगी होती. त्यावेळी तिला कोणतीही अडचण नव्हती किंवा कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना नव्हती. तिला अनेकदा जाडी म्हटले जायचे. मात्र पोटाला सर्कल केल्या व्हिडिओमुळे तिला खूपचं लाज वाटली. एका मिटींगमध्ये तिला सांगितले गेले की, तिच्या वाढत्या पोटामुळे तिचा व्हिडिओ रिलीज केला जाऊ शकत नाही. परंतु ही घटना तिच्यासोबत पहिल्यांदाच घडली नाही, तिच्याबरोबर अनेकदा अशा गोष्टी घडल्या, ज्यावर ती एक संपूर्ण पुस्तक लिहू शकते.

- Advertisement -

नेहा पुढे म्हणाली, “आज मी मोठी झालेय, पण या इंडस्ट्रीत १८ ते १९ वर्षांची मुलं सर्व काही ठीक होईल अशी स्वप्न उराशी बाळगून येतात. पण त्यांना माहित असले पाहिजे की चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही घडतील. मी म्हणत नाही की सर्व जग वाईट आहे. परंतु कधीकधी आपल्याला या गोष्टींमधून जावे लागते. ”

अलीकडेच बिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक म्हणून नेहा भसीन प्रेक्षकांसमोर आली. नेहाने आत्तापर्यंत ‘लाँग गावाचा’, ‘धुनकी’, ‘जग घुमेया’, ‘हीरिये’ आणि ‘स्वॅग से स्वागत’ अशी अनेक गाणी गायली. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅशन’ चित्रपटातील ‘कुछ खास है’ हे तिचे गाणे खूप प्रसिद्ध झाले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -