Urfi Javedने गाठला इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, बोल्ड अंदाजात मानले फॅन्सचे आभार

ट्रोलिंगचा समान करत उर्फीने तिचा कॉन्फिडन्स मात्र सोडला नाही आणि त्याचमुळे उर्फीने आता २ तिच्या इन्स्टाग्रावर २ मिलियन्सचा टप्पा पूर्ण केला

Bigg Boss ott Fem actress Urfi javed complete 2 million followers in instagram
Urfi Javedने गाठला इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, बोल्ड अंदाजात मानले फॅन्सचे आभार

बिग बॉस ओटीटी मधून फार लवकर घराबाहेर गेलेली स्पर्धक अभिनेत्री उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. उर्फीची बिग बॉसमधील संधी हुकली असली तरी त्याचा फायदा तिला बाहेर आल्यावर झाला. उर्फीने घराबाहेर आल्यावर तिचा बोल्डनेस कायम ठेवला. मात्र तिच्या बोल्डनेसमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फी बोल्ड फोटोंमुळे नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. ट्रोलिंगचा समान करत उर्फीने तिचा कॉन्फिडन्स मात्र सोडला नाही आणि त्याचमुळे उर्फीने आता २ तिच्या इन्स्टाग्रावर २ मिलियन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. नुकतेच तिने यासाठी तिच्या फॅन्सचे आभार मानले. मात्र आभार मानताना देखील उर्फीने तिचा बोल्डनेस काही सोडलेला नाही.

इन्स्टाग्रामवर २ मिलियन्स फॉलोअर्स झाल्यानंतर उर्फीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली. ज्यात तिचा बोल्ड अंदाज सर्वासमोर आला आहे. उर्फीने म्हटले आहे, ‘वाह!इन्स्टाग्रामवर २ मिलियन्सचा टप्पा झाला. ही मोठी डील होती. माझ्या सगळ्या फॅन्सचे मी आभार मानते. सगळ्यांना मनापासून धन्यवाद’. उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती बोल्ड अवतारात दिसत आहे. उर्फीने यलो कलरची ब्रॉटेल घातली आहे.

उर्फी बिग बॉसमध्ये फार कमी वेळ होती मात्र तिच्या डॉशिंग स्वभावामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फीने सोशल मीडियावर तिची चांगलीच फॅन फॉलोविंग तयार केली. मध्यतंरी उर्फी ब्लू बिकीनीमध्ये दिसली होती. त्यावरुन देखील ती प्रचंड चर्चेता विषय बनली होती. उर्फी तिच्या डेली रुटीनमध्ये देखील फारच बोल्ड असते. तिच्या प्रत्येक स्टोरी आणि पोस्टमध्ये तिचा बोल्ड अवतार पहायला मिळत असतो. सोशल मीडियावर तिची वेगळी स्टाइल तयार केली आहे.


हेही वाचा – Sunny Leone: सनीचा भर रस्त्यात लुंगी डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले खल्लास