Bigg Boss OTT: करण जोहरवर स्पर्धकांनी लावला पक्षपाताचा आरोप

करण जोहरच्या होस्टिंगवर प्रश्न उपस्थित करत करण पक्षपात करत असल्याचा आरोप बिग बॉसमधील स्पर्धकांनी लावला आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील सुपरहिट रियॅलिटी शो ‘बिग बॉस’(bigg boss ott)चा १५ सीजन ‘Bigg Boss OTT’ सुरू होताच दिवसागणिक प्रेक्षकांच्या मनात अधीक उत्सुकता वाढताना दिसत आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ओटीटीवर प्रसारित होणार बिग बॉसचं होस्टींग दिग्दर्शक करण जोहर (karan johar)करत असून  ‘संडे का वार’ या एपिसोडमध्ये करण स्पर्धकांशी आठवड्या भरातील घडलेल्या घटनांचा लेखाजोखा मांडताना दिसत आहे. गेल्या दोन रविवारी ‘संडे का वार’ एपिसोडमध्ये करणने स्पर्धकांची चांगलीच हजेरी लावली होती. पण या आठवड्यात करण जोहरच्या होस्टिंगवर प्रश्न उपस्थित करत करण पक्षपात करत असल्याचा आरोप बिग बॉसमधील स्पर्धकांनी लावला आहे. मिलिंद गाबा आणि जीशान खान या दोघांनी वक्तव्य केलं आहे की, करण ‘संडे का वार’ एपिसोड दरम्यान कोणत्याही मुलाशी बोलत नाही.(bigg boss ott host karan johar is biased )

नेमकं काय घडलं-

स्पर्धक जीशान खानने अक्षरा सिंहला म्हणाला होता की तू मुलगी आहे,तुझ्या हद्दित राहा. या वक्तव्यावर कमेंट करत ‘संडे का वार’ एपिसोडमध्ये करण जोहरने जीशानला खडेबोल सुनावले. करण जोहरने रागवल्यानंतर सोमवारी मिलिंद गाबा आणि जीशान खान संवादा दरम्यान मिलिंद म्हणाला, ” तू एका महिलेबद्दल वक्तव्य केलं आहे. करणने प्रत्येक महिला स्पर्धकाला याबद्दल मत विचारले. पण कोणत्याही मुलाशी त्याने यावर काहीच प्रश्न विचारला नाही करण फक्त शमिता शेट्टीला बोलण्याची परवानगी देतात तसेच या संवादा दरम्यान दोघांनी करणवर पक्षपाताचा आरोप लावला आहे.


हे हि वाचा – सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने केलं बॉलिवूडमध्ये डेब्यू, करण जोहर सोबत करणार काम