Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Bigg Boss OTT : 'बिग बॉस' शोचा होस्ट आता सलमान खान नाही...

Bigg Boss OTT : ‘बिग बॉस’ शोचा होस्ट आता सलमान खान नाही तर करण जोहर

Related Story

- Advertisement -

हिंदी टेलिव्हिजनवरील सुपरहिट रियॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १५ सीजन ‘Bigg Boss OTT’ लवकरचं सुरु होणार आहे.
यामुळे प्रेक्षकांमध्येही नव्या सीजनबद्दल उत्सुकता वाढली आहे. यंदाचा बिग बॉस अनेक गोष्टींमुळे खास ठरणार आहे. कारण हा शो आता प्रीमियर टीव्हीवर होणार नाही, तर ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. तर शोच्या होस्टमध्येही मोठा बदल केला आहे. सलमान खान दर वेळीप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्टिंग करेल, पण ओटीटीवर जो शो प्रदर्शित होणार आहे, त्याचे होस्टिंग करण जोहर करणार आहे.

करण जोहरने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “ओके, मी आलोय…#bigbossOTT चा होस्ट…भरपूर मजा, मस्ती…वेडेपणा आणि भरपूर मसाला…लवकरच…”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

बिग बॉस १५ चा ओटीटीचा प्रिमियर येत्या ८ ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या शोचे पहिले ६ आठवडे प्रथम ओटीटीवर दाखवले जातील. सलमान खान दर वेळीप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्टिंग करेल, पण ओटीटीवर जो शो प्रदर्शित होणार आहे, त्याचे होस्टिंग करण जोहर करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

सुरवातीचे सहा आठवडे बिग बॉस ओटीटीवर करण जोहर होस्ट करताना दिसून येणार आहे. बिग बॉस ओटीटीवर एपिसोड रिलीज केल्यानंतर बिग बॉस १५ पुन्हा त्याच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच कलर्स चॅनलवर दिसणार आहे. त्यानंतर सलमान खान होस्ट करेल. करण जोहरच्या आधी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे नाव समोर येत होते. मात्र एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, करण जोहरचे नाव यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमान खानने बिग बॉस ओटीटीचा पहिला प्रोमो रिलीज केला होता. यावरून आता शोमधील स्पर्धकांच्या नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहे. यंदाच्या सीजनमध्ये काही सामान्य व्यक्ती सुद्धा दिसून येणार आहेत. यंदा ‘बिग बॉस ओटीटी के मजे लूट, पहली बार स्टार्टिंग ओनली ऑन वूट.’, अशी टॅगलाईन ठेवण्यात आली आहे.


इटलीच्या ‘जीफोनी’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या ‘येरे येरे पावसा’चा वाजला डंका


 

- Advertisement -