घरमनोरंजनBigg Boss OTT: नेहा भसीन आणि रिद्धिमा पंडितचा लिप लॉक सिन होतोय...

Bigg Boss OTT: नेहा भसीन आणि रिद्धिमा पंडितचा लिप लॉक सिन होतोय व्हायरल

Subscribe

नेहा भसीनने शेवटी एक अतरंगी शक्कल लढवत सर्वांसमोर रिद्धिमाला लीप किस केलं.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस (Bigg Boss) या नावापुढे आता वादग्रस्त शो सोबतच बोल्ड शो अशी बिरुदावली देखील लावावी लागणार आहे. कारण यंदाचा बिग बॉस शो मधील कंन्टेट प्रचंड हॉट आणि बोल्ड असणार आहे याचा खुलासा स्वत: सलमान खानने (Salman Khan) प्रोमो दरम्यान केला होता. आता भाईजानच्या या वाक्याची प्रचिती नुकतीच सर्व प्रेक्षकांना आली आहे. काही दिवसांपुर्वीच आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आलेला शो गेले काही दिवस ओटीटी वर प्रसारित होत आहे. पहिले सहा आठवडे हा शो ओटीटीवर (Bigg Boss OTT)प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. शोमधील एक महिला स्पर्धकाने चक्क दुसऱ्या एका महिला स्पर्धकाला किस केलं आहे. शो सुरू होऊन अजून एक आठवडाही पूर्ण झाला नसतांना अनेक रंजक गोष्टी घरामध्ये घडत असल्याचे पाहून प्रेक्षकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.(Bigg Boss OTT: Neha Bhasin and Riddhima Pandit’s lip lock scene goes viral)

नेमकं काय आहे प्रकरण-

वूट (Voot)या ओटीटी माध्यमावर सुरू असणारा बिग बॉस ओटीटीला दमदार सुरूवात झाली आहे. शो मधील स्पर्धक गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) हिने एका टास्क दरम्यान तिच्या प्रति स्पर्धक असणाऱ्या अभिनेत्री रिद्धिमा पंडितला(Riddhima Pandit) किस केलं आहे. घरामध्ये लेडी बॉस शोधण्यासाठी स्पर्धकांना एक टास्क देण्यात येतो यादरम्यान विरोधी स्पर्धकांना पुतळ्यासारखं उभं राहण्यास सांगण्यात येते. तर प्रतीस्पर्धकाने समोर उभ्या असणाऱ्या प्रतिस्पर्धाकाल हालचाल करण्यास भाग पाडायचे असते. यादरम्यान रिद्धिमा स्टॅच्यू बनून उभी होती.आणि नेहा भसीन तिला हलवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सर्व प्रर्यत्न विफल ठरल्यानंतर नेहा भसीनने शेवटी एक अतरंगी शक्कल लढवत सर्वांसमोर रिद्धिमाला लीप किस केलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे सध्या बिग बॉसच्या चाहत्यामध्ये यंदाचा सिजन फारच बोल्ड आणि इंटरेस्टिंग असणार आहे अशा चर्चा रंगत आहे.

- Advertisement -

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

- Advertisement -

हे हि वाचा – निक-प्रियांकाचा क्यूट लंच डेट व्हिडिओ होतोय व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -