BiggBossOTT:राखी सावंतला आवडते शमिता आणि राकेशची जोडी

शमिता व राकेश हे सर्वात कमकुवत कनेक्‍शन आहे, तर निशांत-मूस व प्रतिक-अक्षरा हे प्रबळ कनेक्‍शन्‍स आहेत. शमिता-राकेशने त्‍यांचे प्रेम सर्वांसमोर आणावे.

Bigg Boss OTT Rakhi Sawant's favorite pair of Shamita and Rakesh
BiggBossOTT:राखी सावंतला आवडते शमिता आणि राकेशची जोडी

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस'(Bigg Boss)गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंज करत आहे. यंदाच्या बिग बॉस सिझनमध्ये मेकर्सने काही महत्वपूर्ण बदल केले असून ‘बिग बॉस ओटीटी'(Bigg Boss OTT) वूट (voot) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. तर काही दिवसातच आता कलर्स या वाहिनीवर बिग बॉस टेलिकास्ट होणार आहे. बिग बॉसचा प्रत्येक सिझन गाजत जरी असला तरी काही निवडक स्पर्धकच चाहत्यांच्या लक्षात राहतात. यातील एक स्पर्धक म्हणजे ड्रामा क्विन राखी सावंत (rakhi sawant). बिग बॉसची पहिली पत्‍नी म्‍हणून त्‍याच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करायचे असो, ज्‍युलीमध्‍ये बदललेले तिचे रूप असो बिग बॉसमध्ये लागणारा मनोरंजनाचा तडका राखीमध्ये ठासून भरला होता. नुकतच राखीने बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये प्रवेश मिळवण्‍यासाठी स्‍पायडरवुमनसारखा पोशाख परिधान करत आंदोलन केलं होत. तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासाठी सर्व सीमा पार केल्‍या आहेत. इंडस्‍ट्रीमधील अतरंगी पद्धतीने मनोरंजन करणारी व्यत्ती म्हणजे राखी सावंत. बिग बॉसची निस्‍सीम समर्थक असलेल्‍या राखीने बिग बॉस ओटीटी स्‍पर्धकांबाबत तिचे मत व्‍यक्‍त केले आहे.(Bigg Boss OTT Rakhi Sawant’s favorite pair of Shamita and Rakesh)

काय म्हणाली राखी

घरामधील सर्वात कमकुवत कनेक्‍शन्‍स आणि सर्वात प्रबळ कनेक्‍शन्‍सबाबत विचारले असताना राखी सकारात्‍मकपणे प्रतिसाद देत म्‍हणाली, ”माझ्यामते घरामध्‍ये निशांत भट – मूस आणि प्रतिक सहेजपल – अक्षरा सिंग हे सर्वात प्रबळ कनेक्‍शन्‍स आहेत. ते नेहमीच एकमेकांना पाठिंबा देतात आणि गरजेच्‍या वेळी जोडीदाराच्‍या मागे खंबीरपणे उभे राहतात. त्‍यांना पडद्यावर पाहताना खूपच चांगले वाटते. शमिता शेट्टी – राकेश बापट हे घरातील सर्वात कमकुवत कनेक्‍शन आहे, पण त्‍यांच्‍यामधील केमिस्‍ट्री खूपच छान असल्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांच्‍यामधील प्रेम समोर आणले तर ते सर्वात प्रबळ कनेक्‍शन बनू शकतात.”
राखी पुढे म्हणाली, ”मिलिंद गाबा हा पहिल्‍या सीझनमधील राहुल रॉय सारखा आहे, कोप-यात शांत राहत गेम खेळेल. पण बिग बॉसचा तिसरा डोळा आहे ना, तो सर्वकाही बघत आहे.” ती शेवटी म्‍हणाली की, ”घरात जो एंटरटेनर असणार तोच राहणार.”


हे हि वाचा – Indian Film Festival of Melbourne: ‘मिर्झापूर 2’ ठरला बहुचर्चित क्राइम ड्रामा