घरमनोरंजनBiggBoss15:लवकरच टेलिव्हिजनवर दाखल होतोय बिग बॉस 15

BiggBoss15:लवकरच टेलिव्हिजनवर दाखल होतोय बिग बॉस 15

Subscribe

प्रोमोमध्ये सलमान खानने बिग बॉसचा 15 वा सिझन अतिशय बोल्ड असणार आहे अशी घोषणा केली होती.

हिंदी टेलिव्हिजनवरील सुपरहिट रियॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १५ सीजन ‘Bigg Boss OTT’ सुरू होताच दिवसागणिक प्रेक्षकांच्या मनात अधीक उत्सुकता वाढताना दिसत आहे. यंदाचा बिग बॉस अनेक गोष्टींमुळे खास ठरला आहे. कारण यावेळीस हा शो प्रथम काही आठवडे ओटीटीवर प्रदर्शित केला जात आहे. तर शोच्या होस्टमध्येही देखील मेकर्सने मोठा बदल केल्यामुळे सलमान खान दर वेळीप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्टिंग करेल, पण ओटीटीवर जो शो प्रदर्शित होणार आहे, त्याचे होस्टिंग करण जोहर करणार आहे. नुकतच सलमान खानचा बिग बॉस वरील दुसरा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान एका घनदाट जंगलात वावरताना दिसतोय. सलमान खानच्या एंन्ट्रीने चाहते देखील आनंदित झाले आहेत.(BiggBoss15: Bigg Boss 15 is coming to television soon)

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधीकृत इंस्टाग्राम पेजवर बिग बॉस 15 सिझनचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान एका जंगलाची सैर करताना दिसत आहे. आणि पाठीमागून रेखाचा आवाज येतो. या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ” हे काय होत आहे? बिग बॉस 15 लवकरच येत आहे.” प्रोमो पाहून अनेक नेटकऱ्यांनी यंदा जंगलावर आधारीत काही थीम असणार आहे असा अंदाज लावला आहे.

प्रोमो पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

यंदाचा बिग बॉस शो मधील कंन्टेट प्रचंड हॉट आणि बोल्ड असणार आहे याचा खुलासा स्वत: सलमान खानने (Salman Khan) प्रोमो दरम्यान केला होता. आता भाईजानच्या या वाक्याची प्रचिती नुकतीच सर्व प्रेक्षकांना आली आहे. काही दिवसांपुर्वीच आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आलेला शो गेले काही दिवस ओटीटी वर प्रसारित होत आहे. पहिले सहा आठवडे हा शो ओटीटीवर (Bigg Boss OTT)प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा शो चांगलाच चर्चेत आला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – MX Player वरील ‘सबका साई’ वेब सिरिजला नेटकऱ्यांचा विरोध

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -