घरमनोरंजनBiggBossOTT:ईदच्या मुहूर्तावर भाईजानने दिलं बिग बॉसच्या चाहत्यांना स्पेशल सरप्राइज

BiggBossOTT:ईदच्या मुहूर्तावर भाईजानने दिलं बिग बॉसच्या चाहत्यांना स्पेशल सरप्राइज

Subscribe

टेलिव्हिजनवर बिग बॉस सुरू होण्‍यापूर्वी स्ट्रिमिंग प्लॅटफॉम वूटवर सुरू होणार आहे.

बॉलिवूड दंबग स्टार सलमान खान ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांसाठी एक स्पेशल सरप्राइज घेऊन आला आहे. सलमानने चाहत्यांना यंदाच्या ईदच्या शुभेच्छा ‘बिग बॉस ओटीटी’च्या प्रोमोची घोषणा करत दिली आहे. छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त रियालीटी शो बिग बॉस ओटीटी वर प्रसारीत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज ईदच्या दिवशी सलमानने बिग बॉसचा प्रोमो लॉन्च केला आहे. वूट या ओटीटी प्लॅटफॉमने नुकतच बिग बॉसच्या ओटीटी प्रीमियरची घोषणा केली होती. तसेच वूटने 8 ऑगस्ट रोजी प्रसारीत होणाऱ्या या रियालिटी शो मधील पहिले सहा आठवडे चाहत्यांसाठी 24 तास ऑनलाईन स्ट्रीम करण्यात येणार आसल्याचे जाहीर केलं आले आहे. यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढलेली दिसत आहे. वूटवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान जोरजोरात हसत असल्याचे दिसत आहे. तसेच सलमान बोलत आहे की, “यंदाचा बिग बॉस प्रचंड क्रेजी असणार आहे. तसेच इतका ओव्हर द टॉप असणार आहे की टिव्हीवर बॅन होणार. टिव्हीवर मी सूट-बूटमध्ये शो होस्ट करणार त्यापुर्वी तुम्ही याची वूटवर मजा घ्या. ”

प्रोमो पाहा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

- Advertisement -

टेलिव्हिजनवर बिग बॉस सुरू होण्‍यापूर्वी स्ट्रिमिंग प्लॅटफॉम वूटवर सुरू होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ वर सहा महिन्‍यांच्‍या कार्यक्रमाचे पहिले सहा आठवडे चाहत्‍यांना २४X७ त्‍यांच्‍या मोबाइलवर पाहता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना लोकप्रिय घरामध्‍ये चाललेल्‍या घडामोडी आधीच कळणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्‍यक्‍ती, लोकप्रिय चेहरे व प्रभावक ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये सगभाग घेणार आहे. यावेळी ‘जनता’ फॅक्‍टर सामान्‍य व्‍यक्‍तीला स्‍पर्धकांची, तसेच स्‍पर्धकांचे स्‍टे, टास्‍क्‍स व शोमधील स्पर्धकांना निवडण्याची संधी बिग बॉस ओटीटीवर देण्यात य‌ेणार आहे. एकूणच नवीन सीझन लोकांना मनोरंजनाचा धमाका देणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – संजय लीला भन्साळीच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह ‘बैजू बावरा’ च्या भूमिकेत?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -