Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'वर्षातील माझा सर्वात आवडता दिवस' बिपाशाने केला करणचा बर्थडे सेलिब्रेट

‘वर्षातील माझा सर्वात आवडता दिवस’ बिपाशाने केला करणचा बर्थडे सेलिब्रेट

लाखों तरुणींचा क्रश असलेला अभिनेता करण सिंग ग्रोवर याचा आज ३९ वा वाढदिवस आहे. पत्नी बिपाशा बासू हिच्यासोबत तो मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करत आहे. 'वर्षातील माझा दुसरा सर्वात आवडता दिवस असे म्हणत बिपाशाने करणसाठी पोस्ट शेअर केली आहे.

Related Story

- Advertisement -

टेलिव्हिनचा हॅण्डसम बॉय अभिनेता ‘करण सिंग ग्रोवर’ने छोट्या पडद्यावरुन आजवर लाखो तरुणींची मनं जिंकली आहे. करणने अनेक मालिकांमधून वेगवेगळी पात्र साकारली असून त्याच्या डॅशिंग लूक आणि फिटनेसमुळे करणने लाखो तरुणींच्या मनावर राज्य केलं. करणने २००४ सालात ‘कितनी मस्त हे जिंदगी’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. यानंतर ‘दिल मिल गये’ ही करणची सर्वांत लोकप्रिय मालिका ठरली असून या मालिकेतील त्याच्या ‘डॉक्टर अरमान’ या भूमिकेनं चाहत्यांना वेड लावलं होतं. या मालिकेमुळे करणला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे अनेक तरुणी करणवर फिदा झाल्या होत्या. करण हा रिलेशनशिप्स आणि तीन लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला. आज करणचा ३९ वा वाढदिवस आहे. पत्नी बिपाशासोबत तो सध्या मालदीवमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

करण आणि बिपाशा यादोघांनीही मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटोज् त्यांच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. बिपाशाने करणचा फोटो शेअर करताना ‘वर्षातील माझा दुसरा सर्वात आवडता दिवस…हॅपी बर्थ डे करण … i love u’ असं कॅप्शन देत ‘करण’ला शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशाच्या या पोस्टवर अनेक सलिब्रेटींनी आणि चाहत्यांनी करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

मालिकांनंतर करण काही रिअॅलिटी शोमध्यही झळकला. खासकरुन तरुण वर्गाने करणच्या भूमिकांना कायम पसंती दिली. मालिकांबरोबरच काही चित्रपटांमध्येही करणने अभिनयाची छाप पाडली आहे. अलोन आणि हेट स्टोरी -३ या सिनेमांतून करणने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. मात्र त्याचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाही. काही वेब सिरीजमध्येही करण झळकला. गेल्या काही दिवसांपासून करण अभिनय क्षेत्रापासून दुरावल्याचे दिसतंय. असं असले तरी आजही करणचा मोठी चाहतावर्ग आहे. व करणच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून तुफान लाईक्स् मिळत असल्यांच् पाहायला मिळतं.

- Advertisement -