बिपाशाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चिमुकलीचे घरी जोरदार स्वागत

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने 12 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माने बिपाशा आणि करण दोघेही खूप खूश आहेत. दरम्यान, आज बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी मुलीला हातात घेऊन जात असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलीच्या जन्मानंतर बिपाशाची पहिली झलक
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर करण आणि बिपाशाचे काही पत्रकारांकडून फोटो टिपण्यात आले. यावेळी दोघांनीही मुलीसोबत पोझ दिली. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तसेच यावेळी दोघांनी ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी बिपाशा बसूने पती करणसोबत बेबी बंपचे फोटो शेअर करत गरोदर असल्याची बातमी दिली होती. या बोल्ड फोटोशूटमध्ये दोघांनी रोमाँटिक पोज दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर या फोटोंमुळे अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं होतं.

2016 साली झालं बिपाशा-करणचं लग्न
बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘रक्त’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशासोबतचे हे त्याचे तिसरे लग्न आहे.

 


हेही वाचा :

मुलगी झाली हो, बिपाशाने दिला गोंडस मुलीला जन्म