मॅटर्निटी फोटोशूटनंतर ट्रोल करणाऱ्यांना बिपाशाचं सडेतोड उत्तर

बिपाशाने केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकजण बिपाशाला सोशल मीडियावर ट्रोल करू लागेल. दरम्यान, नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिपाशाने ट्रोलर्सना चांगलेच सडेतोड उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु लवकरच आई होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या बेबी बंप आणि पतीसह एक सुंदर फोटोशूटमधील फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती शेअर केली होती. बिपाशाने सांगितलेल्या या आनंदाच्या बातमीने सर्वांना आनंद झाला होता. परंतु बिपाशाने केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकजण बिपाशाला सोशल मीडियावर ट्रोल करू लागेल. दरम्यान, नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिपाशाने ट्रोलर्सना चांगलेच सडेतोड उत्तर दिलं आहे.

मॅटर्निटी फोटोशूटनंतर सोशल मीडियावर बिपाशाला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. मात्र आता बिपाशाने देखील त्या ट्रोलर्सना चांगलंच सडेतोड उत्तर दिल आहे. त्यावेळी बिपाशा म्हणाली की, “यामध्ये काय चूक आहे. जेव्हा आम्ही प्रेग्नेंसी फोटोशूट करण्याचा विचार केला तेव्हा आम्ही आमची हे फोटोशूट साजरं करायचं होतं. आता आम्ही दोघे आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही तिघे असू. आम्ही या फोटोशूटमध्ये बेबी बंप दाखवलं कारण ते सध्या आमच्या बाळाचे घर आहे. बेबी बंपसोबत कोणत्याही स्त्रिला पाहिलं की मला खूप छान वाटतं. मी आई होणार आहे आणि माझ्या शरीरामध्ये अनेक बदल होत आहेत. आम्हाला फक्त असे फोटो हवे होते, जे आमच्या मधील प्रेमाला चांगल्या प्रकारे दाखवू शकेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बासु पुढे म्हणाली की, “हा आमच्या आयुष्यातील खूप आनंदाचा टप्पा आहे. उद्या जेव्हा मला बाळ होईल. तेव्हा हा क्षण नाही येणार. त्यामुळे आम्ही हा क्षण आत्ताच आनंदाने साजरा करत आहोत.”


हेही वाचा :

कपिल शर्माच्या ‘मेगा ब्लॉकबस्टर’मध्ये दीपिका पादुकोणची एन्ट्री