Video : Birthday Special आशा भोसलेंच्या ‘या’ पाच गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य!

Happy Birthday Asha Bhosle: Asha Bhosle's magic continues even at the age of 88)
Happy Birthday Asha Bhosle: ८८ व्या वर्षीही आशा भोसलेंचा करिष्मा कायम

लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस. संगीताचा वारसा मुळातच त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. वडील दिनानाथ मंगेशकर आणि बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायिकेच्या रुपात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितिक कारकीर्दीला सुरुवात झाल्यापासून त्यांचा प्रवास आजतागायत सुरुच आहे. त्यांनी आपल्या करीयरच्या सुरूवातीला गायलेली गाणही ओठांवर रेंगाळतात. एक नजर त्यांच्या हजारो गाण्यांमधील निवडक पाच गाण्यांवर

‘दम मारो दम’

 

आशा भोसले यांच्या गाण्यांनी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातील एक गाणं म्हणजेच – झीन तमान आणि देवानन यांच्यावर चित्रीत झालेलं दम मारो दम हे गाणं.

‘पिया तू अबतो आजा’

 

आशा भोसले यांनी आजपर्यंत अनेक पठडीतील गाणी गायली त्यात ‘कॅब्रे’ या प्रकरातील गाणीही होती. त्यातलच एक ‘पिया तू अबतो आजा हे गाणं’.

झुमका गिरा रे

‘झुमका गिरा रे’ हे आशा भोसले यांनी गायलेलं ‘मेरा साया’ या चित्रपटातील गाणं खूप लोकप्रिय झालं

‘दिल चीज क्या है’

तर शास्त्रीय गायकीवर आधारीत ‘दिल चीझ क्या है’ आशा भोसलेंच आणखी एक गाणं वेगळ्या पठडीतलं आहे.

 ‘पान खाये सय्या हमारो’

‘पान खाये सैया हमारो’ अशा भोसलेंच आणखी एक बहारदार गाणं