घरमनोरंजनHBD: संघर्षमय प्रवासाला मागे सारत झाकीर खान बनला प्रसिद्ध स्टँन्डअप कॉमेडियन !

HBD: संघर्षमय प्रवासाला मागे सारत झाकीर खान बनला प्रसिद्ध स्टँन्डअप कॉमेडियन !

Subscribe

झाकीरने त्याच्या करियरची सुरूवात एका रेडिओ चॅनलमध्ये कॉपी रायटर रिसर्च म्हणून केली होती.

स्टँन्डअप कॉमेडीयन झाकीर खान (zakir khan )सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ माजवत आहे. झाकीर खानचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. झाकीरचा कॉमेडी टायमिंग कमाल आहे.  झाकीर खानसाठी आजचा दिवस खास आहे. झाकिर आज त्याच्या 34 वां वाढदिवस साजरा करत आहे. या स्पेशल दिवसानिमित्त झाकीरच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. झाकीरचा जन्म एका सामान्य कुटुंबात  २० ऑगस्ट १९८७ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्याच्या वडिलांचं नाव इस्माईल खान आणि आईचं नाव कुलसूम खान आहे. झाकिरचा कॉमेडीचा अंदाज इतर कलाकांपेक्षा काही वेगळा आणि खास आहे. आणि याच वैशिष्ट्यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. झाकीरने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केलं आहे.तसेच झाकीरने सतार वादनामध्ये डिप्लोमा केला आहे.(birthday special zakir khan )

झाकीरने त्याच्या करियरची सुरूवात एका रेडिओ चॅनल मध्ये कॉपी रायटर रिसर्च म्हणून केली होती. त्याने तब्बल चार वर्ष एफएम रेडिओमध्ये काम केलं. एक कॉमेडी सेंट्रल चॅनल मधील इंडिया बेस्ट स्टँन्डअप कॉमेडियन हा शो जिंकल्यानंतर झाकीरच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. स्पर्धा जिंकल्यानंतर झाकीरला एआयबीच्या युट्यूव चॅनलमधील एका नवीन शोची ऑफर मिळाली. हा शो देखील प्रचंड गाजला आणि या व्हिडिओमधून झाकीर अधीक लोकप्रिय होत गेला.

- Advertisement -

झाकिरने अभिनय क्षेत्रात देखील नशिब आजमावयाचे ठरवले. ‘चाचा विधायक हैं’ या सारख्या वेब सिरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आज झाकीर यशाच्या उंच शिखरावर विराजमान आहे.


हे हि वाचा – रणदीप हुड्डाला महिला लेखिकेने पाठवली नोटीस, मागितली दहा कोटींची नुकसान भरपाई

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -