घरमनोरंजन'ब्लेस यू' चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर

‘ब्लेस यू’ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Subscribe

या चित्रपटाची कथा आहे सदानंद नावाच्या एका मुंबईतील सरकारी कारकुनाची आहे. एका रविवारी सदानंद आपल्या कुटुंबासोबत बाजारहाट करायला निघतो.

दिग्दर्शक संजय सुरे यांचा ‘ब्लेस यू’ या हिंदी चित्रपटाचा प्रीव्हू 16 सप्टेंबरला मुंबईत पार पडला. विविध मान्यवर चित्रपट समिक्षकांनी चित्रपटाला उत्फूर्त दाद दिली. ‘ब्लेस यू’ या वर्ल्ड प्रिमीयर नुकताच 45 व्या एशियन अमेरिकन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2022 न्यूयॉर्क येथे पार पडला. भूतानच्या ड्रक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2022 येथे हा चित्रपट विजेता ठरला. तसेच टोकियो, पौस इत्यादी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये याची निवड झाली आहे.

या चित्रपटाची कथा आहे सदानंद नावाच्या एका मुंबईतील सरकारी कारकुनाची आहे. एका रविवारी सदानंद आपल्या कुटुंबासोबत बाजारहाट करायला निघतो. नंतर कुटुंबासोबत रसत्याच्या कडेला असलेल्या एका गाडीवर गोळा खाताना त्याला शिंक येते आणि त्यानंतर त्याचं जगच बदलत. याची एक गमतीदार कहाणी यात दाखविली आहे. गोष्ट शेवटपर्यंत दर्शकांना खिळवून ठेवते. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय सुरे यांचे आहे. जाहिरात क्षेत्राचा प्रदिर्घ अनुभव गाठीशी असून ते जे.जे स्कूल ऑफ आर्टचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. अत्यंत कलात्मक पद्धतीने चित्रपट हाताळण्यात ते यशस्वी झालेले आहेत.

- Advertisement -

या चित्रपटातील चित्रीकरण मुंबईच्या विविध स्थळांवर, रस्त्यांवर, गल्ल्यांमधून अत्यंत खूबीने व सहज, नैसर्गिक वाटावे असेच आहे.या चित्रपटामध्ये मनिष कुमार आणि अंकिता मुसाई हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर मोहनीश कल्याण यांनी साकारली आहे. सर्व कलावंत हे देशभरातील भागात रंगकर्मी म्हणून सक्रिय आहे. रंगमंचावरील अनुभवातूनच त्यांचा कसदार अभिनय रंगत आणतो. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


हेही वाचा :

‘ती मी नव्हेच’ चित्रपटात उर्मिला मातोंडकर आणि श्रेयस तळपदे झळकणार एकत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -