फुकटात शो कर नाहीतर.., आयुक्तांच्या नातेवाईकाची सोनू निगमला धमकी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पद्मश्री सोनू निगमला मुंबई महापालिका आयुक्तांच्या नातेवाईकाकडून धमकी देण्यात आल्याचा दावा भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे नातेवाईक राजिंदर सिंह हे आपल्याला धमकी देत असल्याची सोनू निगम यांनी तक्रार केल्याचे अमित साटम यांनी काल(शुक्रवार) विधानसभेत सांगितले. सोनू निगम यांनी मोफत शो दिला नाही तर त्यांना महापालिकेची नोटीस बजावली जाईल, अशी धमकी राजिंदर सिंह देत आहेत. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

इक्बाल सिंग चहल हे सोनू निगमला धमकावल्याच्या आरोपाबाबत खोटे बोलत आहेत. ही बाब समोर आल्यानंतर अमित साटम यांनी राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

भाजप आमदाराने विधानसभेत मांडला मुद्दा

इक्बाल सिंग चहल यांचे नातेवाईक राजिंदर निगम यांना फ्री शो करण्यात यावे, यासाठी धमकी देत आहेत. अन्यथा त्यांच्या घरी नोटीस पाठवून तोडक कारवाई करण्यात येईल. याची राज्य सरकारने नोंद घ्यावी, अशी तक्रार गायक सोनू निगमने केली होती. त्यामुळे आयुक्त आणि त्यांच्या नातेवाईकावर कारवाई करावी, अशी मागणी साटम यांनी केली.

सोनू निगमकडे आहेत ऑडिओ रेकॉर्डिंग्स ?

सोनू निगमकडे राजिंदर सिंहने पाठवलेले मेसेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. या सूत्रांचा संदर्भ देत भाजप आमदार म्हणाले की, सोनूने अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीये.

इक्बाल सिंग चहल यांचं स्पष्टीकरण

इक्बाल सिंग चहल यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हा ते म्हणाले की, राजिंदर हा माझा चुलत भाऊ किंवा नातेवाईक सुद्धा नाहीये. हे मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो. कारण राजस्थानमध्ये माझा जन्म झाला होता. मात्र, तो त्याच जिल्ह्यातला आहे. त्याच्या या गैरवर्तनाबद्दल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं चहल म्हणाले.


हेही वाचा : The Kashmir Files : फक्त ‘द काश्मीर फाईल्स’वरच नाही तर गुजरात फाईल्सबद्दलही बोललं पाहिजे : सुशीलकुमार शिंदे