घरमनोरंजनक्वारंटाईनचे नियम मोडीत काढल्यानंतर आलियावर BMC करणार कारवाई ? झाला मोठा खुलासा

क्वारंटाईनचे नियम मोडीत काढल्यानंतर आलियावर BMC करणार कारवाई ? झाला मोठा खुलासा

Subscribe

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोना व्हायरसची लागण झाली. या पार्टीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)देखील सहभागी होती. मात्र आलियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून सुरक्षिततेच्या अंतर्गत तिला मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाच्या वतीने सात दिवस होम क्वार्ंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आगामी सिनेमाच्या प्रमोशन करीता आलिया क्वार्ंटाईनच्या नियमांच उल्लंघण करुन दिल्लीला रवाना झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता मुंबई महानगर पालिकेने आलिया भट्टला मोठा दिलासा दिला आहे.

माहितीनुसार आलिया भट्टने क्वारंटाईनचे नियम मोडीत काढले नाहीत. आलिया भट्ट काल चार्टड विमानाने मुंबईत दाखल झाली आहे. आलिया भट्ट हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आलियाला सलग सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. मात्र त्यानंतर आलिया पाच दिवसांच्या आतच दिल्लीत ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. आलियाने एका दिवसाच्या कामासाठी  क्वारांटाईनचे नियामांच उल्लंघन केल्याने तिचे एयरपोर्टवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्याने आलियाने याबाबत आता स्पष्टीकरण दिले आहे. आपण एका दिवसाच्या कामासाठी दिल्लीला जात असून मझा कोव्हिड रिपोर्ट देखील निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

यानंतर आलियाने कोणत्याही कोरोना नियमांच उल्लंघन केलेल नाहीये हे स्पष्ट झालं. आलियाने कोरोना विलगीकरणाचे पाचही दिवस पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी कोरोना चाचणी केली आही ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच आलिया मुंबईबाहेर रवाना झाली. त्यामुळे आलियावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाहीये अशी माहीती समोर आली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – अखेर अरुणिता-पवनदीप अडकले विवाह बंधनात, लग्नसोहळ्यातील फोटो होतोय व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -