Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनBobby Deol : बाबा निराला साकारताना घाबरला होता बॉबी देओल, म्हणाला

Bobby Deol : बाबा निराला साकारताना घाबरला होता बॉबी देओल, म्हणाला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या ‘एक बदनाम आश्रम’ या सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा दुसरा भाग नुकताच रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. सध्या या सीरिजला प्रेक्षकांकडून मिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान, एका मुलाखतीत बॉबी देओलने प्रमोशनदरम्यान त्याला व्हर्टिगोचा अटॅक आल्याचा खुलासा केला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Bobby Deol felt dizzy due to fear during promotion of Aashram 3)

‘आश्रम’च्या तिसऱ्या सीझनच्या दुसऱ्या भागाचे प्रमोशन करताना दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता बॉबी देओलने जनतेची प्रतिक्रिया काय असेल? याची भीती वाटत असल्याचे सांगितले. यावेळी तो म्हणाला, ‘एक बदनाम आश्रम या सिरीजच्या पहिल्या सीझनच्या प्रमोशनसाठी मी बाहेर गेलो होतो. तेव्हा मी इतका घाबरलेलो की मला चक्कर आली. लोकांच्या माझ्याबद्दल काय प्रतिक्रिया येतील? ते मला कसं पाहतील? याची मला खूप भीती वाटत होती. मी माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अशी नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यामुळे जेव्हा पहिला सीझन आला तेव्हा मी खरंच खूप घाबरलो होतो’.

‘मला चांगलं आठवतंय त्या दिवशी मी सीरिजच्या प्रमोशनसाठी बाहेर पडलो आणि भीती, टेन्शनमुळे मला व्हर्टिगोचा अटॅक आला होता. याविषयी मी माझ्या आई वडिलांना देखील सांगितलेलं नाही. पण खरोखरंच या सिरीजबाबत किंवा माझ्याबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील याची मला भीती वाटत होती’. आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना बॉबी देओलने सांगितले, ‘बाबा निरालाच्या व्यक्तिरेखेसाठी होकार देणे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण, त्यावेळी मी कमबॅक करत होतो आणि यापूर्वी मी अशी भूमिका कधीच साकारली नव्हती. पण अभिनेता म्हणून मी हा प्रयोग करून पाहिला’.

पुढे म्हणाला, ‘त्यावेळी मी खूप नर्व्हस होतो. सहसा, एखादा सिनेमा तयार होतो तेव्हा कलाकार तो सिनेमा रिलीजआधी पाहतात. पण इथे असं काहीच घडलं नाही. सिरीज रिलीज झाल्यावर आम्ही एपिसोड पाहिले. इकडे मी एपिसोड पाहत होती आणि दुसरीकडे माझा फोन वाजत होता. एकामागे एक मॅसेज येत होते. या सिरीजबद्दल किंवा माझ्या व्यक्तिरेखेबद्दल माझ्या पालकांना काही माहित नव्हते. त्यामुळे प्रत्यक्षात एपिसोड रिलीज झाल्यानंतर त्यांना धक्का बसला. माझ्या आईला कॉल्सवर कॉल येत होते. अजूनही माझ्या पालकांना त्यांचे मित्र फोन करून ‘या सिरीजचा पुढील सीझन कधी येईल?’ असे विचारत असतात.

हेही पहा –

Hruta Durgule : तरुणांची क्रश हृता दुर्गुळेचा अभिनय विश्वातील प्रवास