घरमनोरंजनबॉडी-बिल्डिंगचा वेडेपणा… सिद्धांत सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट

बॉडी-बिल्डिंगचा वेडेपणा… सिद्धांत सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट

Subscribe

हिंदी टेलिव्हिजन अभिनेता आणि मॉडेल सिद्धांत वीर सूर्यवंशीचे 11 नोव्हेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 46 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. सिद्धांतने हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्घांतला हृदयविकाराचा झटका आला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सिद्धांतच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. अनेकजण सिद्धांतच्या अचानक जाण्याने शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी देखील सिद्धांत मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

त्यांनी त्यांच्या ट्वीट अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करत लिहिलंय की, “हे खूप दुखःद आणि खतरनाक आहे. बॉडी बिल्डिंगचा वेडेपणा कोणत्याही सल्ल्याशिवाय घातक आहे. हायपर जिमिंग हा एक नवीन शब्द आहे. जो इंस्टाग्राममुळे चर्चेत आहे. याला नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. समाजाला विचार करावा लागेल. सिद्धांत ओम शांती.” विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटसोबतच एक फोटो देखील शेअर केला आहे.

आत्तापर्यंत वर्कआऊटमुळे झाला या अभिनेत्यांचा मृत्यू
यावर्षी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, दीपेश भान, कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांसारख्या अभिनेत्यांचा वर्कआऊट करताना मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा देखील याच कारणामुळे मृत्यू झाला होता.

- Advertisement -

या मालिकांमध्ये केलं होत काम
सिद्धांत सूर्यवंशीने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेव्यतिरिक्त त्याने ‘सुफियाना इश्क मेरा’, ‘जिद्दी दिल माने ना’, ‘वारिस’ आणि ‘सात फेरे: सलोनी का सफर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘क्यू रिश्तो मे कट्टी बट्टी’ या मालिकेत तो शेवटचा दिसला होता.

 


हेही वाचा :

टीव्ही जगताला हादरा; ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -