CoronaEffect – कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आणखी एक बॉलिवूडकर आला धावून!

देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणावर परिणाम चित्रपटसृष्टीवर झाला आहे. कारण गेले काही दिवस चित्रपटसृष्टी बंद आहे. अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरही मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यांच्यासाठी अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आता या यादीत आणखी एक नाव अड झालं आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने या कर्मचाऱ्यांसाठी ५१ लाख रूपये दिले आहेत.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एख व्हीडिओ करत ही माहिती दिली. चित्रपट सृष्टीतील पाच लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी ५१ लाखांचा निधी दिल्याबद्दल तुमचे. तुम्ही प्रत्येक वेळी संकटसमयी मदतीसाठी धावून आला आहात. तुम्ही खरंच सिंघम आहात,” असं अशोक पंडित या व्हीडिओत म्हणाले आहेत.

अजय देवगण यांच्यापूर्वी चित्रपट निर्माता रोहीत शेट्टी यानंदेखील ५१ लाखांचा निधी दिला होता. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कलाकारही कामगारांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तर दुसरीकडे अभिनेता सलमान खानंही FWICE कडे २५ हजार कामगारांचे अकाउंट नंबर मागितले आहेत. याद्वारे थेट त्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमारनंही पंतप्रधान मदत निधीमध्ये २५ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. कार्तिक आर्यन,  अनुष्का शर्मा, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे.